Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गा ची रुंदी कमी करावी ; व्यापार्‍यांची मागणी चे तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन

जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गा ची रुंदी कमी करावी ; व्यापार्‍यांची मागणी चे तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन

mahalokwaniBy mahalokwaniMarch 10, 2023Updated:March 10, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरातील महावीर भवन येथे दि.९ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता व्यापारी,टपरीधारक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेते यांची जामखेड 548 D अतिक्रमण संदर्भात बैठक पार पडली या या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापारी व टपरीधारकांना पाठिंबा दिला व जामखेड शहरातील सर्व टपरीधारक व व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही.

या करिता आज रोजी जामखेड तहसिल कार्यालय येथे तहसिलदार योगेश चंद्रे व जामखेड पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,जामखेड हे बीड, नगर, सोलापूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील शहर आहे त्यामुळे जामखेड शहराची बाजारपेठ अतिशय मोठी व नावाजलेली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 हा जामखेड शहरातून जातो त्या नगर बीड रस्त्यावरच बाजारपेठेतील बहुतांश व्यवसाय आहेत जामखेड शहर हे केवळ व्यापारावर अवलंबून असणारा शहर आहे शहरांमध्ये आर्थिक उत्पन्नाचा इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही बाकी शहरांच्या तुलनेत जामखेडमध्ये औद्योगिक वसाहत, विद्यापीठ, कॉलेज, मोठ्या संस्था व इतर रोजगार उपलब्ध होणारा कोणताही स्त्रोत नाही केवळ फक्त व्यवसायावर अवलंबून असणारा हा आपला शहर आहे अशा शहराचा विचार करता आपण जर 50 फूट दोन्ही बाजूने जागा ताब्यात घेतली तर जामखेड मधील नगर-बीड रस्त्यावरील 80 ते 90 टक्के इमारतींना धोका निर्माण होत आहे यामध्ये काही इमारती या 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या असल्यामुळे त्या संपूर्ण पाडल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहत नाही सदरील काम होत असताना खूप मोठ्या प्रमाणावर व्यापार पेठेची व बाजाराची आर्थिक परिस्थिती खालावणार आहे अशा परिस्थितीमध्ये जामखेडला होणारा व्यापार हा इतर तालुक्यांमध्ये जाईल व जामखेडची व्यापार पेठ उध्वस्त होईल अशा कारणामुळे जामखेड मधील लहान मोठ्या व्यवसायिकांवर प्रचंड अस्वस्थता पसरली आहे व दबाव निर्माण झालेला आहे.
यावेळी अशोक (काका) शिंगवी, राजेंद्र (काका) कोठारी, युवा उद्योजक आकाश शेठबाफना,शरद शिंगवी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,विनायक राऊत,महावीर बाफना,अजय कोठारी,पिंटू बोरा,पवन राळेभात, मंगेश बेदमुथ्था,संकेत ढाळे,प्रविण शिलवंत,संयोग पितळे, कांतीलाल कोठारी ,अमोल तातेड ,ऋषिकेश खरात,श्रीकांत ढाळे, अमित ओकर, गणेश पोठरे, सुरेश महाजन, मारोती शहदेवराज , अर्जुन भोगल, अमोल क्षिरसागर, अजित भोगल, आशुतोष छाजेड, सागर अंदुरे , नयन पितळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

शहरातील दोन्ही बाजूंनी अंतर हे दहा मीटर केले तर जामखेड मधील 90 ते 95 टक्के व्यवसायिकांचा बांधकाम व व व्यापार सुरळीत चालू राहील व जामखेड ची व्यापार पेठ ही प्रगतीपथावर राहील. या सर्व केलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक भूमिका घेऊन अंतर हे दहा मीटर करावे यामध्ये डिव्हायडर व युटिलिटी एरिया कमी केला तर हे होणं शक्य आहे याकरिता उद्या दिनांक 11/3/2023 रोजी जामखेड बाजारपेठ बंदची हाक व्यापारी असोसिएशन तर्फे देण्यात आलेली आहे .

प्रतिक्रिया:- मा.आकाश बाफना
युवा उद्योजक

जामखेड शहरातील पंचदेवालय ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग रोड अंतर तेवढेच ठेवावे परंतु इतर युटीलिटी व संबंधित डिव्हायडर एरिया हा कमी केला तर बहुसंख्य लोकांचा दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही व व्यापार पेठ अबाधित राहील त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही म्हणून उद्या शनिवार रोजी जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराजकीय व सामाजिक क्षेत्रात गरुडझेप घेणाऱ्या आमदार निलेश लंके यांचा आज वाढदिवस..! विविध कार्यक्रमांचे आयोजन
Next Article आमदार रोहित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकासाच्या निधीसह इतरही महत्वाच्या विषयावर झाली सकारात्मक चर्चा
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.