Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार रोहित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकासाच्या निधीसह इतरही महत्वाच्या विषयावर झाली सकारात्मक चर्चा

आमदार रोहित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकासाच्या निधीसह इतरही महत्वाच्या विषयावर झाली सकारात्मक चर्चा

mahalokwaniBy mahalokwaniMarch 10, 2023Updated:March 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

कर्जत / जामखेड | नुकतीच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल अर्थसंकल्पीय भाषणामध्ये थोर व्यक्तींच्या जन्मभूमीच्या बाबतीत बोलत असताना अनावधानाने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहिला होता तो उल्लेख महापुरुषांच्या जन्मभूमीच्या विकासाच्या बाबतीत जेव्हा ते उत्तर देतील त्या उत्तरात ते सकारात्मक राहतील असा विश्वास व्यक्त करत चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो निधी देण्यात आलेला आहे त्यावर असलेली स्थगिती देखील उठवण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांनी केली आहे.

गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचा २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी संतांचा उल्लेख आपल्या भाषणातून केला. यालाच अनुसरून आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी संत श्री सद्गुरू गोदड महाराज, सिताराम बाबा व गीते बाबा यांच्या समाधीस्थळ विकासासाठी देण्यात आला आहे. परंतु त्यापैकी काही विकास निधीवर सध्या सरकारने लावलेली स्थगिती उठवावी अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार रोहित पवार हे कायमच कटिबद्ध असतात. त्यानुसारच त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील गणपती मंदिर व राशीन येथील जगदंबा मंदिर ह्या देवस्थान विकासासाठी तसेच खर्डा किल्ल्याच्या विकासासाठी विकासाचे मोठे प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयापर्यंत आणून ठेवले होते परंतु सरकार बदलल्यानंतर त्या बाबतीत कोणतीही कार्यवाही झालेली नाही तर त्याला मान्यता द्यावी अशी विनंती यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली आहे जेणेकरून आध्यात्मिक, धार्मिक आणि शक्तीपीठ यांना एक एक नवी दिशा आणि ताकद या माध्यमातून देता येईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गा ची रुंदी कमी करावी ; व्यापार्‍यांची मागणी चे तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
Next Article कोरोनानंतर आता जीवघेणा H3N2 व्हायरस; जाणून घ्या, हा व्हायरस किती धोकादायक आणि लक्षणे काय ?
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.