Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कोणे होते पहिले भारतीय गव्हर्नर, जे Finance Minister ही होते? २ भाषेत छापली होती बजेटची प्रत..

कोणे होते पहिले भारतीय गव्हर्नर, जे Finance Minister ही होते? २ भाषेत छापली होती बजेटची प्रत..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 2, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भारत स्वतंत्र झाल्यापासून दरवर्षी संसदेत अर्थसंकल्प सादर केला जातो आणि वर्षभर त्याची चोख अंमलबजावणीही केली जाते. हा अर्थसंकल्प देशाचं भवितव्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. पण आज अशा अर्थमंत्र्यांविषयी जाणून घेऊ, जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर देखील राहिले होते.

निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुधीर तांबे स्मशानभूमीत, गमावला जवळचा सहकारी ..!

चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांना सी.डी. देशमुख म्हणूनही ओळखलं जायचं. ते देशाचे तिसरे अर्थमंत्री म्हणून तुम्हाला माहीत असतीलच. पण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले पहिले भारतीय अर्थमंत्रीही राहिले आहेत. सी.डी. देशमुख हे भारतीय सनदी अधिकारी होते. त्यांची प्रशासकीय कारकीर्द जवळपास २१ वर्षीची होती. मध्य प्रांतात त्यांनी महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली. पुढे १९३९ च्या जुलैमध्ये सी.डी. देशमुखांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली.

त्यानंतर दोनच वर्षात म्हणजे १९४१ साली मणिलाल नानावटी यांच्या जागी सी. डी. देशमुख RBI चे डेप्युटी गव्हर्नर झाले. त्यानंतर १९४३ साली RBI चे गव्हर्नर जेम्स टेलर यांचं निधन झालं. टेलर यांच्या निधनानंतर रिझर्व्ह बँकेला पहिला भारतीय गव्हर्नर लाभला, तो सी. डी. देशमुखांच्या रुपानं. ११ ऑगस्ट १९४३ रोजी सी.डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला. ते ३० जून १९४९ या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर सीडींना भारताच्या व्हॉईसरॉयमार्फत ‘नाईटहूड’ बहुमान देण्यात आला.

खरंतर शासकीय आणि प्रशासकीय पदांची सी.डी. देशमुख यांच्या आयुष्यात कधीच वानवा नव्हती. १९६९ साली राष्ट्रपतीपदाची निवडणूकीत ते पराभूत झाले. हे एक पद वगळता, सी.डींनी अपयश पाहिलं नाही. आपल्या ज्ञानाच्या जोरावर ते केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरच नाही, तर पुढे केंद्रीय अर्थमंत्रीही झाले. १९५० मध्ये त्यांचा देशाचे अर्थमंत्री म्हणून नेहरूंच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

१९५६ पर्यंत ते देशाचे अर्थमंत्री राहिले. जास्तीत जास्त अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या बाबतीत त्यांचे नाव चौथ्या क्रमांकावर येते. स्वतंत्र भारतात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी यांनी आठ वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले. त्यांच्यानंतर पी चिदंबरम यांनी नऊ वेळा, प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा आणि यशवंत सिन्हा, यशवंत राव चव्हाण आणि सीडी देशमुख यांनी प्रत्येकी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला.

आता लालपरी चालवणार ‘ती’; लवकरचं राज्यात पहिल्यांदा महिला चालवणार ST बस !

अर्थमंत्री सीडी देशमुख यांना अर्थसंकल्पात अनेक ऐतिहासिक बदल करण्याचे श्रेय जातं. सीडी देशमुख यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची प्रत इंग्रजी आणि हिंदीत छापण्यात आली. पूर्वी बजेटची प्रत फक्त इंग्रजी भाषेतच छापली जायची. यासोबतच अर्थसंकल्पाच्या पद्धती, स्वरूप आणि उद्दिष्टांमध्ये मोठे बदल घडवून आणणारे अर्थमंत्री म्हणूनही देशमुख यांची आठवण होते. त्यांच्या कार्यकाळातच देशात पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनिवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुधीर तांबे स्मशानभूमीत, गमावला जवळचा सहकारी ..!
Next Article राखी सावंतची नवऱ्याला धमकी; “…तर आदिल खान व त्या मुलीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करणार”
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.