Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुधीर तांबे स्मशानभूमीत, गमावला जवळचा सहकारी ..!

निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुधीर तांबे स्मशानभूमीत, गमावला जवळचा सहकारी ..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 2, 2023Updated:February 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

मागच्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान नाशिक पदवीधर विधानपरिषदेचा आज निकाल लागणार आहे. या दरम्यान सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तील असलेले नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार नाशिकमध्ये जात असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामुळे सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

मानस पगार हे काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी ही दु:खद बातमी येऊन धडकल्याने धक्का बसल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर आज पिंपळगाव बसवंत या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा कोणत्याही परिस्थितीत मला अटक होणार, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान- म्हणाले, “केंद्रातील..!

राजकारणातील तरुण चेहरा म्हणून मानस पगार Manas Pagarना ओळखले जात होते. मानस पगार हे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय तरुण नेते होते. अचानक झालेल्या अपघातामुळे पगार यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मानस पगार यांच्या निधनामुळे एका उमद्या आणि तरुण नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
बुधवारी रात्री अपघात झाल्यानंतर मानस पगार यांना तातडीने नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात मानस पगार यांचे काही सहकारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा हिंदू जन आक्रोश कशासाठी ?

बुधवारी रात्री उशिरा नाशिक-मुंबई महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारची पुढील बाजुचा पूर्णपणे चुराडा झाल्याने मानस पगार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान मानस पगार हे तांबे कुटुंबियांच्या जवळचे असल्याने तांबे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. यामुळे सत्यजीत तांबे यांचे वडील मतमोजणीच्या ठिकाणी न जाता ते अत्यसंस्कार करण्यासाठी हजर झाले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleरोड रोमिओंचा योग्य पध्दतीने बंदोबस्त करणार – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड
Next Article कोणे होते पहिले भारतीय गव्हर्नर, जे Finance Minister ही होते? २ भाषेत छापली होती बजेटची प्रत..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.