डॉ . बाळासाहेब पवार :- राजकीय अभ्यासक

महालोकवाणी न्यूज:-
भारतात सर्वाधिक लोकसंख्या हिंदू धर्मियांची आहे . सर्व सत्ता स्थाने, नोकरशाही , पोलीस दल ,सैन्यदल यात 90% पेक्षा जास्त संख्या हिंदूंची आहे . तरी या देशातील हिंदू चा जनाक्रोश कशासाठी हा प्रश्न भारतात नव्हे तर जगातील ज्या देशात ही बातमी पोहचते त्या देशातील जनतेला सुद्धा पडला असेल . आतां जगात कोठे काहीही घडो ते देशापुरते मर्यादित राहत नाही . सोशल मीडिया .इलेक्ट्रॉनिक मीडिया तुन जगभर पोहचले जाते.
भारतात गेली आठ वर्ष नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे . व जगातील सर्व हिंदूंची संघटना आहे असा दावा करणारी व आंतरराष्ट्रीय संघटन असणारी राष्ट्रीय सेवक संघ ही नरेंद्र मोदी व अमित शहा सरकारची मातृ संस्था आहे . जागतिक पातळीवर गुजरात गोद्रा नर संहारा नंतर त्यांची प्रतिमा हिंदूंचे नेतृत्व म्हणूनच पुढे आली . व हिंदू ही एक शक्ती आहे असा सदेश जगाला मिळाला आहे. तरीही भरतातील हिंदू आक्रोशीत का आहे. तो रस्त्यावर उतरून जन आक्रोश मोर्चे काढून आपला आक्रोश जगा पुढे का मांडतो आहे . ही बाब जागतिक पातळीवर धकादायक आहे तेव्हडीच . मोदी व शहा सरकार ची प्रतिमा जागतिक पातळीवर खराब करणारी आहे . हिंदू या मुद्यावर व देवळांच्या राजकारणावर सत्तेत आलेले सरकार त्याच हिंदू चे रक्षण करू शकत नाही . व हिंदू आक्रोशीत आहे व ती रस्त्यावर उतरतो आहे हे मोठे अपयश आहे असाच त्याचा अर्थ निघतो .
भरततील हिंदू जो आक्रोशीत आहे का आहे हे तो सुद्धा सांगू शकत नाही मी आक्रोशीत आहे . तो देशात परकोटीला पोहचलेल्या बेरोजगारी मुळे आक्रोशीत झाला आहे का ?तो देशात प्रचंड महागाई झाली आहे म्हणून आक्रोशीत आहे का ?तो देशातील सरकार विरुद्ध आक्रोशीत आहे का? या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही . मग जन आक्रोश कशासाठी आहे हा सभ्रम कायम राहतो.
भरतात हिंदू वर मुस्लिम , बौद्ध, ख्रिश्चन ,आदिवासी अन्याय अत्याचार तर करत नाहीत ना असाही समज होऊ शकतो . व हिंदुत्ववादू सरकार असताना हे असे कसे घडते आहे की हिंदूंना हिंदूंचे सरकार असताना जन आक्रोश मोर्चे काढावे लागत आहेत . हिंदू आपल्या हिंदुत्ववादी हिंदुरक्षक सरकार कडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकत नाही का ? मोदी व शहा सरकार हिंदूंचे ऐकत् नाही .किंवा त्यांचे सरक्षण करू शकत नाही असा सदेश जगाला जात आहे. याची जाणीव या सरकार ला आहे का . हा खरा प्रश्न आहे.
राजकारणा साठी आपण काय करतो हा विवेक व विचार शिल्लक राहिला नसेल तर अशा घटना घडत राहतात . अशाच घटना मुस्लिम देशात घडल्या आहेत . मुस्लिम देश धर्माच्या कायद्या नुसार चालणारे व मुस्लिम राज्यकर्ते असताना असाच जनाक्रोश तयार होत गेला . मोर्चात झेंडे घेतलेल्या पंचवीशी च्या आतील वयाच्या मुलांच्या हातातील झेंडा काढून त्याच्या हातात शस्त्र सोपवले गेले . व ते देश आपसात यादवी होऊन बेचिराख झाले . तिथे तर त्यांचा एकमेव धर्म होता दुसरा धर्म त्या देशात नव्हता . तरी महासत्तां नी ते घडून आणले .ही नोद घेण्यासारखी बाब आहे .
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचा परीक्षा कामकाजवर बहिष्कार ?
जनाक्रोश राजकीय असला तरी तो आपला हिंदू चा अपमान करणारा आहे . आम्ही आमच्या देशात आक्रोशीत आहोत व तो मुद्दा अत्यंत वैयक्तिक व कौतुंबीक आहे . व अतिशय तुरळक घडणाऱ्या घटना वर आधारित आहे . आम्ही हिंदू आणखी एक बाब विसरून आक्रोश करत आहोत . आमची संस्कार क्षमता कमी झाली आहे . किंवा संस्कार कमी पडत आहेत म्हणून आम्ही कायदा करा म्हणत आहोत का ? आमच्या मुलींनी आंतर धर्मीय विवाह का करावेत व ते केल्यास तिची फसवणूक व शोषण अत्याचार होतो म्हणजे सध्या देशातील कायदा कमी पडतो आहे . मग आमचे सरकार असताना सरकार योग्य काळजी का घेत नाही . त्या साठी जन आक्रोश का करावा लागतो .
बोगस डॉक्टरामुळे गेले महिलेचे प्राण..! प्रस्तुतीदरम्यान घडला प्रकार
हा प्रश्न समाजिक आहे की राजकीय याचा अगोदर विचार करावा लागेल . लग्न ही कौतुंबीक व व्यक्तिगत बाब आहे व विवाह संस्था ही समाजिक संस्था आहे . आतर धर्मीय विवाहाच विचार समाजिक मंचा वर व्हावा ना की तो राजकीय मुद्दा बनावा . फक्त हिंदू मुलीच दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न करतात का . मुस्लिम मुली हिंदुशी लग्न करत नाहीत का . हे प्रमाण पण खूप मोठे आहे मग मुस्लिमानी पण असंच जन आक्रोश मोर्चे काढावेत का . आपल्याच हिंदू मुला मुलींचे विवाह होतात तेव्हा त्यांचा छल् होत नाही असे नाही . कुटूंब न्यायालयात सर्वाधिक खटले हिंदू चेच आहेत की जे पिढ्या न पिढ्या एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत.
याचा दुसरा भयंकर परिणाम म्हणजे आपल्याच मुली बद्दल हिंदू कुटूंबात निर्माण होणारी असुरक्षितता याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होत आहे . तिचे व्यक्ती स्वातंत्र्य संकुचित होऊन . ती सतत संशया खाली ठेवली जात आहे . आपल्याच मुली बद्दल असलेले प्रेम आता या प्रकारामुळे संशययात बदलत आहे . मुली बद्दल पालकाल सतत चिंतेत ठेवणारे वातावरण निर्माण होत आहे . मग मुलगी कोणत्याही धर्माची असो
हा मुद्दा रस्त्यावर न आणता आपण आपल्या कुटूंबातील सु सवाद वाढवून आपल्या लेकरावर योग्य संस्कार करून थोपवू शकतो . या व्यक्तिगत पातळी वरील व्यवहाराला कोणता संपूर्ण धर्म जबाबदार धरून गलिच्छ राजकारण करणे आपल्या देशाला परवडणारे नाही . मुस्लिम मुली हिंदू मुलाशी लग्न करतात तेव्हा आपण हिंदू म्हणून दोषी ठरतो असा अर्थ घेण्यात अर्थ नाही .
या प्रकारच्या प्रतिक्रिया मुस्लिम धर्मात उमटत आहेत तिथे ही हिच असुरक्षे ची भावना निर्माण होत आहे . अगोदरच मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे . यातून मुलींना बुरखा किंवा हिजब घालणे आता बंधन कारक होत आहे . मुस्लिम धर्मीय फारच धर्म निरपेक्ष व विशाल दृष्टी कोण असणारे आहेत असा अजिबात भाग नाही . कट्ट्रवादी लोक सर्वच धर्मात असतात . मुस्लिम मुलींना विशिष्ट्य शाळेत माध्यमात व ठराविक इय्यते पर्यंत शिक्षण देण्याचे प्रमाण वाढत आहे . मुळातच मुस्लिम मुलींचे शिक्षणात प्रमाण कमी आहे . त्यात या असुरक्षित्तेत ते प्रमाण आणखी कमी होऊ लागले आहे. हिंदू मुली म्हणजे आपलीच प्रॉपर्टी समजून काही संघटना जशा ठेकेदार बनल्या आहेत तोच प्रकार मुस्लिम धर्मीयता पण आहे . हिंदू जास्त असलेल्या शाळेत न शिकवणे . हिंदू मुलांशी बोलू न देणे असे काही प्रकार झाल्यास हल्ला करणे हे प्रकार ही वाढत आहेत .
यात बळी जातो तो स्त्री चा . तिच्या जगण्याचा संकोच होतो . ती हजारो वर्ष धार्मिक . पारंपरिक अत्याचाराची बळी ठरली आहे . ती आता पुन्हा राजकारणा पाई बळी ठरर आहे.यात आणखी एक आंतर मुख करणारा प्रश्न आहे या देशातील प्रत्येक हिंदू शी आम्ही प्रेम व सहकार्य व समानतेच्या भावनेने वागतो का किंवा त्या सहकार्य करताना पवित्र भावनेने काही लाभ न घेता करतो आहोत का . तर च आपल्याला रस्त्यावर उतरण्याचा अधिकार पोहचतो . अगोदर गरीब , बेरोजगार,महागाई ने ग्रस्त हिंदू चा आक्रोश ऐकायला हवा . ना की राजकारणा साठी रस्त्यावर केलेला आक्रोश. एकवेळ अशी येईल की या राजकारणात बळी पडणाऱ्या सर्व धर्मीय स्त्रियांचा नुसता आक्रोश नव्हे तर आक्रमक जन आक्रोश प्रत्येक घरा घरात ऐकायला मिळेल व पुरुष सत्त्ताक धर्मांध व्यवस्थेला तडे जायला लागतील.
डॉ . बाळासाहेब पवार
राजकीय अभ्यासक
