Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आता लालपरी चालवणार ‘ती’; लवकरचं राज्यात पहिल्यांदा महिला चालवणार ST बस !

आता लालपरी चालवणार ‘ती’; लवकरचं राज्यात पहिल्यांदा महिला चालवणार ST बस !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे : महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत.

जान्हवी कपूर पुन्हा दिसली तिच्या बॉयफ्रेंड; या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

मार्चनंतर लालपरीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती

स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरूषांच्या पुढे जाऊन नाव लौकिक मिळवत आहेत. मात्र, काही क्षेत्र अजूनही आहेत जिथे पुरूषांचे वर्चस्व कायम आहे आणि ते क्षेत्र म्हणजे एसटी. महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 27 डिसेंबरपासून या सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण मार्चअखेर पूर्ण होईल आणि लालपरीचे स्टेअरिंग या महिलांच्या हाती येईल.

एसटी चालक होण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना आवश्यक असतो.. या महिलांच्या वाहन परवान्यांची पूर्ण प्रकिया ही एसटी महामंडळाकडूनच पूर्ण करण्यात आलीय.. आता हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करुन या महिला एसटी चालकांची चाचणी होईल आणि यानंतर मार्च अखेरीस या महिला लालपरीतून प्रवाशांना घेवून जाण्यासाठी सज्ज होणार आहेत. या सेवेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांचे बस चालवायचा प्रशिक्षण काळ सोपा नव्हता. या महिला वाहकांचे शिक्षण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कुणी बँकेत सेल्स मॅनेजर होते. कुणाचे एमएसडब्ल्यू झाले आहे. तर कुणी इंजीनियरिंग पूर्ण करून सेवेत रुजू झाले आहेत.

सरळ सेवा 2019 अंतर्गत महिला चालकांची भरती करण्यात आली. यासाठी आता राज्यातील 21 आगारात 206 महिला चालक पात्र आहेत. पुणे, नागपूर, गडचिरोली, कोल्हापूर, भंडारा, नाशिक, गडचिरोली, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, धुळे, सांगली अशा एकूण 21 आगारात सरळसेवा भरती करण्यात आली. यानंतर राज्यात 35 महिला मार्च अखेरपर्यंत एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू होणार आहेत.

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचा परीक्षा कामकाजवर बहिष्कार ?

2019 मध्ये भरती झालेल्या या महिलांना चालक म्हणून त्यातही एसटीसारख्या मोठ्या बसचे चालक म्हणून तयार करणे हे सोपे काम नव्हते. सहा महिने सलग तब्बल 3 हजार किलोमीटर गाडी वेगवेगळ्या रस्त्यांनी घाटांनी चालवून या महिलांना चालक म्हणून तयार केले आहे. आम्हाला शून्यातून सुरेश हिडगे आणि खळदकर सरांनी घडवले आहे, असे या महिला सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकोणत्याही परिस्थितीत मला अटक होणार, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान- म्हणाले, “केंद्रातील..!
Next Article रोड रोमिओंचा योग्य पध्दतीने बंदोबस्त करणार – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.