Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ विरोधात गौरवयात्रा, काय घडणार?

छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ विरोधात गौरवयात्रा, काय घडणार?

mahalokwaniBy mahalokwaniApril 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

युती सरकारला आसमान दाखवण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. कोणत्याही कारणाने ही मूठ सैल पडू द्यायची नाही, असा चंग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बांधलाय. सत्ताधाऱ्यांविरोधातील रणशिंग फुंकण्यासाठी महाविकास आघाडीने संयुक्त संभांची घोषणा केली. मराठवाड्याचं प्रवेशद्वार संभाजीनगरातून पहिल्या सभेची घोषणा केली. २ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या सभेसाठी युद्धपातळीवर तयारी केली जातेय. मात्र त्याच दिवसापासून भाजपच्या गौरवयात्रेचंही आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राला उजाळा देण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा आयोजित करण्याची घोषणा शिंदे फडणवीस यांनी केला. संभाजीनगरात ही गौरव यात्रा २ ते ५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २ एप्रिल रोजी संभाजीनगरात शिंदे-भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचं मोठं शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांविरोधात वज्रमूठ आवळली आहे. येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील प्रदेशांनुसार एकूण सात ठिकाणी महाविकास आघाडीच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. संभाजीनगरातील पहिल्या सभेची जबाबदारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर देण्यात आली आहे. तर तिन्ही पक्षांच्या वतीने कार्यकर्त्यांनी सभेची तयारी सुरु केली आहे. मराठवाड्यातील सर्वच शहरांतील नागरिकांपर्यंत वज्रमूठ सभेचं निमंत्रण पोहोचवलं जातंय. संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणाऱ्या या सभेला उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

राजकीय शक्तिप्रदर्शन

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. राम नवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागातील राम मंदिरासमोर झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीमुळे शहरातल्या शांततेता तडा गेलाय. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असली तरीही दोन गटात झालेल्या या राड्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तर राजकीय नेते या घटनेसाठी परस्परांना दोषी ठरवत आहेत. येत्या दोन दिवसांनी होणारी मविआची संयुक्त सभा आणि भाजपची गौरव यात्रा यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही कार्यक्रमांतून राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

 तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार, भाजप-शिवसेनेतर्फे राज्यभरातून वीर सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभदेखील संभाजीनगरातून २ एप्रिल रोजी होणार आहे. शहरातील सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून संभाजीनगरातील या यात्रेला प्रारंभ होणार आहे. सहकार मंत्री अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रविवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत शहरातील तिन्ही मतदारसंघात भव्य रथातून ही यात्रा काढण्यात येईल. सावरकरांचे विचार, त्यांच्या आठवणी, चित्रफिती, सावरकरांची भाषणं या चित्ररथातून ऐकवली जातील.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसाई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्यावतीने महिलांचा सन्मान; महिलांना दररोज सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे- रूपालिताई चाकणकर
Next Article जामखेडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा ; आमदार प्रा. राम शिंदें व सैराट फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा उपस्थित
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.