जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड येथील एसटी स्टँड मध्ये एक अनोळखी व्यक्ती बडबडत असल्याचे निलेश वनारसे यांच्या लक्षात आले त्याच्या अंगावर कपडे नव्हते थंडीने काकडून पॅरेलेस झाला असावा असा अंदाज आल्याने निलेश वनारसे याने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना शुक्रवार १७/२/२०२३ रोजी सकाळी६:०० सहा वाजता मोबाईल वर माहिती दिली सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन ताबडतोब बस स्टॅन्ड वर आले असतात त्यास आपल्या रुग्णवाहिकेत घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले.

व्यक्तीशी चर्चा केली असता त्यांनी त्याचे नाव श्रावण हरिभाऊ उजगरे भीम नगर परळी असे सांगितले असून त्याच्या मुलाशी कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याने जामखेडला काही अडचणीमुळे येण्यास नाकार दिला आहे. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले जामखेड एसटी स्टँड मध्ये महिन्यात दोन-तीन घटना घडत आहेत काही जखमी असतात तर काय मृत असतात तर काहीच अंगावर गाड्या गेलेल्या असतात अशा बेवारस आणि घरी न राहणाऱ्या व्यक्ती बस स्टैंड वर आपला गुजारा करत असतात अशा प्रत्येकांना आनुन दवाखान्यात दाखल करण्याचे मला समाधान वाटतेसाधारण
हे नक्की वाचा :- चुलीतील राखेची Amazon वरील किंमत पाहा; चक्क तुम्हालाही बसेल धक्का, वाचा सविस्तर..
आतापर्यंत जामखेड एसटी स्टँड मध्ये ५ पाच जणांचे मृत्यू झाले आहेत तर बरेच जण जखमी अवस्थेत आणून दवाखान्यात दाखल केले आहेत त्यांचे प्राण वाचले आहेत चालू महिन्यामध्ये मारामारी झाली असता पाच जण जखमी अवस्थेत आणून दवाखान्यात दाखल केले होते तसेच दोन दिवसापूर्वी अशीच एक व्यक्ती एस टेन च्या गेटवर महिला चक्कर येऊन पडली होती तिला आणून दवाखान्यात दाखल केले तसेच गेल्या दोन वर्षांपूर्वी एसटी स्टँड वरील बेवारस वृद्धांना गोरगरिबांना मी स्वेटर वाटले होते आणि बऱ्याचदा जेवण आणि मिठाई दिलेली आहे.यावेळी ऋषिकेश गांगर्डे, आबा वराडे यांनी मदत केली
