Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महाशिवरात्रीनिमित्त आमदार राम शिंदे यांच्या हस्ते होणार पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा ‘गंगाजल’ महाभिषेक

महाशिवरात्रीनिमित्त आमदार राम शिंदे यांच्या हस्ते होणार पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा ‘गंगाजल’ महाभिषेक

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 16, 2023Updated:February 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार

कर्जत-जामखेड :

इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या 250 वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीवर महाशिवरात्रीनिमित्त गंगेच्या पाण्याचा (गंगाजल) महाअभिषेक केला जातो. यंदा होणाऱ्या महाअभिषेक सोहळा आणि विठ्ठल पुजेचा मान कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाताई राम शिंदे यांना मिळाला आहे. येत्या 18 फेब्रुवारी 2023 रोजी पंढरीच्या विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती होळकर ट्रस्टचे पंढरपूर येथील व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर यांनी दिली.

इंदौर येथील होळकर राजघराण्याकडून गेल्या 250 वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशातील 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपुरातील विठ्ठल मुर्तीची महाशिवरात्रीनिमित्त महापूजा केली जाते.यासाठी इंदोर येथील होळकर ट्रस्टच्या वतीने गंगेचे उगमस्थान असलेल्या गंगोत्री येथून पवित्र गंगाजल आणले जाते. या पवित्र गंगाजलाचा 12 ज्योतिर्लिंगे आणि पंढरपूर येथील विठ्ठल मूर्तीवर महाशिवरात्रीदिवशी रात्री 12 वाजता अभिषेक केला जातो. तसेच महापूजा केली जाते.पंढरपुर येथील विठ्ठल मूर्तीवर महाशिवरात्री दिवशी बेल वाहिले जाते. कारण विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. विठ्ठलाला शैव वैष्णवाचं प्रतिक मानलं जातं.आषाढी एकादशीला विठ्ठलाची जशी महापूजा असते तशीच महापुजा महाशिवरात्री दिवशी केली जाते.या महापुजेसाठीचे सर्व साहित्य होळकर ट्रस्टकडून दिले जाते.

प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त रात्री बारा वाजता गंगेच्या पाण्याचा (गंगाजल) महाअभिषेक सोहळा यंदा 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी होणाऱ्या महा अभिषेक आणि महापुजेचा मान कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाताई राम शिंदे यांना मिळाला आहे. इंदौरच्या होळकर ट्रस्टच्या वतीने त्यांना हा मान देण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासमवेत शिंदे दाम्पत्याच्या हस्ते महाअभिषेक आणि महापूजा होणार आहे, अशी माहिती होळकर ट्रस्टचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपुरकर यांनी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले नागरिकांना कर भरण्याचे आवाहन
Next Article जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची जखमी अवस्थेत असणाऱ्या वृद्धास मदत
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.