Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरच्या साई-यात्रेचा लोणार सरोवर ला समारोप भाविकांना तीर्थयात्रा घडविणे हे पुण्यच- दिपक गुलमोहोर

नगरच्या साई-यात्रेचा लोणार सरोवर ला समारोप भाविकांना तीर्थयात्रा घडविणे हे पुण्यच- दिपक गुलमोहोर

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 12, 2023Updated:January 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर – सामाजिक कार्यातून समाज सेवेचे व्रत जो जोपासतो, त्या कार्याला ईश्वर देखील गती देत असतो. अध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिक भावना खूप महत्वाची असते. मनापासून काम केले कि मनासारखी तीर्थयात्रा घडते. भाविकांना तीर्थयात्रा घडविणे हे एक प्रकारचे पुण्यच असते, असे प्रतिपादन बी.बी.ग्रामपंचायतीचे सरपंच दिपक गुलमोहोर यांनी केले.

Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा?


नवीन वर्षाची सुरुवात भाविकांना दरवर्षी धार्मिक स्थळांना, तीर्थयात्रेला घेवून जाण्याचा उपक्रम नगर येथील सावेडी उपनगरातील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान 9 वर्षापासून राबवित आहे. साई-यात्रा 2023 चा समारोप बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बी.बी.गावात करण्यात आला. याप्रसंगी सरपंच श्री.गुलमोहोर यांनी आयोजक व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनिल त्र्यंबके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विठ्ठल देवकर, गजानन काकडे, अमोल मुळे, गजानन इंदुरीया, संदिप बनकर, दिलीप चव्हाण, कृष्णा पदे, निलेश चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल आटोळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रशांत इंगळे, शंभुराजे ग्रुपचे अध्यक्ष आनंद आटोळे आदिंसह नगरचे साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव योगेश पिंपळे, आकाश त्र्यंबके, तिरमलेश पासकंटी व भाविक उपस्थित होते.

Advt


श्री.गुलमोहोर पुढे म्हणाले, या साईयात्रा व प्रतिष्ठानचे उपक्रम नगरच्या मित्रांकडून मी ऐकून होतो, ही यात्रा आमच्या गावात येणार म्हणून आयोजकांशी संपर्क साधून सेवा म्हणून आमच्या ग्रुपच्यावतीने भोजन व्यवस्था ठेवली. दर वर्षी विविध तीर्थक्षेत्राला भेटी देऊन आज आमच्या गावात नगरच्या भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य समजतो.
नगरसेवक सुनिल त्र्यंबके यावेळी म्हणाले की, साईबाबांची प्रेरणा मिळाल्याने त्याच्या नावानेच प्रतिष्ठान स्थापन करुन त्यांच्या कृपेनेच ही सेवा माझ्याकडून घडवित आहेत. दरवर्षी हजारो भाविक धार्मिक, तीर्थक्षेत्री येऊन, नतमस्तक होतात, दर्शनाने आनंद मिळतो. त्यांच्या आनंदात आम्ही आमचा आनंद मानतो.

गजराजनगर जवळ गादी कारखाना आगीत भस्म नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी तत्परता दाखवल्यामुळे वाचला अनेकांचा जीव


योगेश पिंपळे यांनी यात्रे विषयी माहिती देतांना सांगितले की, यावर्षी 16 ट्रॅव्हल्समधून सुमारे 800 भाविकांना श्रीक्षेत्र गजाजन महाराज यांच्या शेगांव येथील समाधी स्थळ, मंदिर तसेच श्रीक्षेत्र नागझरा आदिंसह लोणार सरोवर येथील महादेव मंदिर आदि ठिकाणी भेटी दिल्या. साई यात्रा 2023 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक असे परिश्रम मोहाळे देवा, खिल्लारी साहेब, स्वप्निल वाघ, पूजा याला, देविदास डहाळे ,संगीता बार्वेकर, महेश काजळकर ,मरकड मॅडम ,गौरी दडगे ,रेश्मा पवणे महेश पंडित, खामकर, आव्हाड समस्त साईभक्त आदींनी सहकार्य केले.त्यानंतर बी.बी.गावचा वतीने सरपंच, सदस्य यांनी भाविकांना अन्नदान करुन सेवा दिल्याबद्दल योगेश पिंपळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSatyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा?
Next Article रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.