Nashik: नाशिक पदवीधर विधानसभा निवडणुकीत एकापाठोपाठ एक ट्विट पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसने एबी फॉर्म देवूनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. ज्याला महाविकास आघाडीने पाठींबा दिला होता.
मात्र आता यामध्ये मोठा ट्विट आला असून महाविकास आघाडी पुरस्कृत सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
काँग्रेसच्या माजी. मुख्यमंत्र्याचा मुलगा आता भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर !
याबाबत अधिक माहिती अशी की, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळेच सर्वांचे लक्ष भाजपाच्या उमेदवाराकडे लागले होते. त्याचसोबत भाजपाकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचीही बातमी समोर आली होती. मात्र आता या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत असून भाजपाने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्यााची बातमी समोर येत आहे.
पॉर्न व्हिडिओ दाखवायचे आजोबा आपल्या नातीला, नंतर ११ वर्षांच्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार…
दरम्यान, भाजपाने पाठिंबा जाहीर केला असली तरी, सत्यजित तांबे यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पक्षाकडून एबी फॉर्म न दिल्याने भाजपामध्ये मात्र नाराजी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजपाचे इच्छुक उमेदवार धनराज विसपुते यांनी अपक्ष फॉर्म भरला असल्याचीही माहिती समोर आली आहे.
