महालोकवाणी न्युज :-
मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांचा राजीनामा 9 नवीन सदस्य, नगरसेवक सुनील त्र्यंबके यांना संधी. नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती कुमार सिंह वाकळे यांनी सर्वसाधारण सभेत राजीनामा दिला असून मनपाच्या महासभेमध्ये नवीन नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, सुनील त्र्यंबके,नजीर शेख, शिवसेनेच्या सुवर्णा गेणाप्पा, सुनीता कोतकर, कमल सप्रे यांची वर्णी लागली आहे. भाजपाच्या पल्लवी जाधव, प्रदीप परदेशी तर बसपाचे मुदत्सर शेख यांची निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक सुनील त्रंबके यांनी केलेल्या प्रभागातील कामामुळे त्यांची निवड झाली असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
