Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बरळले; पुण्यातील पोटनिवडणूकमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान..

चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बरळले; पुण्यातील पोटनिवडणूकमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2023Updated:February 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांचं नाव घेत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून घेऊन येतील, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. पुणे कसबा पोटनिवडणूक पार्श्वभूमीवरील मेळाव्यात ते बोलत होते.

रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून प्रचारासाठी घेऊन येतील. त्यावेळी म्हटलं पाहिजे, “ओ धंगेकर आता तुम्ही महात्मा गांधींना घेऊन आलात ते आम्हाला वर्षभर नाही पुरणार”, असं चंद्रकांत पाटील यांना म्हटलं. हेमंत रासने यांना काहीही करून विजयी करायचं आहे.कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जिंकायचीच आहे, असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटलांना काँग्रेसच उत्तर

चंद्रकांत पाटलांच्या टिकेला उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं की, महात्मा गांधींची भिती त्यांना (भाजप) आधीपासून आहेच, ती आजही कायम आहे. याचाच अर्थ आहे की गांधींच्या मुल्याने पुढे चालणारी काँग्रेस यांच्या हुकूमशाहीला आडवी येत आहे आणि संविधान पुढे जात आहे.काँग्रेस कधीही तब्येत ठिक नसलेल्या नेत्याला प्रचारात उतरवणार नाही. एकवेळ काँग्रेस निवडणूक सोडून देईल. यांनी जे गिरीश बापट, लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्यासोबत केलं तसं काँग्रेस कधीही करणार नाही.

एकवेळ निवडणूक गेली तरी चालेल पण आपल्या माणसाचा जीव वाचला पाहिजे हे जास्त महत्व काँग्रेससाठी राहिल, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरसेवक सुनील त्र्यंबके यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदी निवड
Next Article आता ठाकरेविना शिवसेना; ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.