Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नांदेड हादरलं; २३ वर्षीय तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; प्रेमसंबंधामुळे घरच्यांनीच खून करून राख केली विसर्जित !

नांदेड हादरलं; २३ वर्षीय तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; प्रेमसंबंधामुळे घरच्यांनीच खून करून राख केली विसर्जित !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नांदेड : नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच त्यांच्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड असं मृत मुलीचं नाव आहे. गावातील तरुणासाेबत असलेल्या प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खून करून प्रेत जाळल्‍याचे समोर आले आहे.

‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !

या विषयी अधिक माहिती अशी की, 23 वर्षीय शुभांगी ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसमध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरूणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे तिची सोयरिक लाऊन दिली होती. काही दिवसांवर लग्न आले असताना, काही कारणामुळे आठ दिवसांपूर्वी सोयरिक मोडली. त्यामुळे शुभांगीच्या कुटुंबीयांना राग अनावर झाला होता. मुलीमुळे गावात बदनामी झाली. या कारणाने गेल्या रविवारी रात्री कुटुंबीयांनी तिची हत्या करून मृतदेह शेतात जाळून टाकला. राखदेखील बाजूच्या ओढ्यात टाकून दिली.

‘प्रकाश आंबेडकरांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत’, आमदार रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया !

तीन दिवसांपासून मुलगी गावात दिसत नसल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली, तेव्हा ऑनर किलिंगचा हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, मामा, भाऊ आणि काकांची दोन मुले अशा पाच जणांना अटक केली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article‘प्रकाश आंबेडकरांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत’, आमदार रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया !
Next Article दौंड पोलीस स्टेशनच्या संघाने पटकवला क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.