Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा ?; भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जरा स्पष्टचं बोलले…

राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा ?; भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जरा स्पष्टचं बोलले…

mahalokwaniBy mahalokwaniApril 5, 2023Updated:April 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. मनसे नेते राज ठाकरे हेही उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करत आहेत. दुसरीकडे, राज ठाकरे यांचे भाजपा आणि शिंदे गटाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं चित्र दिसत आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना पर्याय ठरू शकतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी ठरवलं तर ते राज्याचे नेतेही होऊ शकतात, अशा आशयाचं विधान बावनकुळेंनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पर्याय असू शकतात का? असं विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकतं, त्यांनी (राज ठाकरे) विचार केला तर ते राज्याचे नेतेही होऊ शकतात.” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.

तुमचेही लहान मुलं शाळेत जातात ना; पण तिथे त्यांना अशी वागणूक तर मिळत नाही ना VIDEO पाहून येईल संताप.!

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मनभेद झाले आहेत, पण राज ठाकरेंशी मनजुळणी सुरू आहे का? असं विचारलं असता बावनकुळे पुढे म्हणाले, “राज ठाकरे हे मनाने दिलदार आहेत. मनुष्य म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून ते दिलदार मनाचे आहेत. त्यांचं मन छोटं किंवा किंचित नाही. त्यांचं मन मोठं आहे. मोठ्या मनाची माणसं कधीही मनभेद होऊ देत नाहीत. किंचित मनाची माणसं मनभेद होऊ देतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हाच फरक आहे. उद्धव ठाकरे छोट्या मनाचे आहेत. राज ठाकरे मोठ्या मनाचे आहेत. राज ठाकरेंची मैत्री ही खूप चांगली आहे. राजकारणाच्या दृष्टीने मैत्री करण्यासाठी मी कधीही त्यांच्याकडे गेलो नाही किंवा तेही कधी माझ्याकडे आले नाहीत. पण आम्ही दोघंही एकमेकांच्या घरी अनेकदा गेलो आहोत. आम्ही कधीही राजकारणावर बोलत नाहीत.”

निवडणुकांमध्ये मनसेला गरज लागली तर त्यांच्या पाठीशी महाशक्ती उभी कराल का? असा प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले, “आज अशी काही चर्चा नाही. त्यामुळे यावर आज बोलून काही उपयोग नाही. राजकारणात उद्या काय होईल? हे मलाही माहीत नाही. पण आज तरी तशी परिस्थिती नाही. पण राज ठाकरेंशी आमची चांगली मैत्री आहे.”

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजिल्हा परिषद शाळेतून च नवीन पिढी घडत आहे- अनुजा गाईकवाड
Next Article जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात महावीर जयंती साजरी.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.