महालोकवाणी न्यूज अहमदनगर ता.29 ,जाने 23
अहमदनगर प्रतिनिधी:- विजय मते
नगर – प्रत्येक व्यक्तीने आपले आचार व विचार, कुळाचार याचे धर्मास अनुसरुन आचरण करतांना समाजाच्या सामुदायिक पद्धती पुन्हा प्रस्थापित करणे, आपल्या हिंदू धर्माची परंपरा टिकवण्यासाठी आपला धर्म, संस्कृती जीवनपद्धती टिकविणे हे कर्तव्य समजावे, असे आवाहन कोल्हापूर येथील करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी केले.
पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; हजारो पेन्शनधारकांवर टांगती तलवार, वाचा नेमकं प्रकरण काय ?
सावेडी उपनगरात शिलाविहार येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मंदिरात जयंतीनिमित्त सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा सोहळ्यास जगद्गुरू शंकराचार्य यांनी उपस्थित राहून उपदेश केला. यावेळी भागवत कथा मंदार महाराज रामदासी, हभप सुंदरदास रिंगणे, हभप सौ.रेखाताई रिंगणे, प्रसाद देवा, अशोक मुळे, लहू बडे , संतोष भोंग, विजय मते, सेवा भावी मंडळाचे कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
पाडळी येथे अखंड हरिनाम नामजप सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न !
जगद्गुरु शंकराचार्य पुढे म्हणाले, सूर्य 24 तास प्रकाशमान असला तरी तो पुर्वेला उगवतो व पश्चिमेला गेला कि अंधार सुरु होतो. आपण भारतीय ‘पौर्वात्य’ आहोत, पण आपल्याला पा श्चिमात्यांचे आकर्षण वाटते. आम्ही आपल्या पायाने अंधार्या युगाकडे चाललो हे चुकीचे आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडला तर तुमचा विनाश अटळ आहे. तेव्हा आपल्या हिंदू धर्माचे रक्षण प्राणपणाने करा, असे आवाहन त्यांनी केले.
भागवत कथाकार मंदार महाराज रामदासी यांचा सन्मान शंकराचार्यानी केला. रिंगणे देवा यांनी आभार मानले.
