जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरातील खर्डा चौक व जयहिंद चौक येथे नाका बंदी करुन विना नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांवर जामखेड पोलीसांची मोठ्या प्रमाणात कारवाई केली.

बॉस, भाई, दादा, काका, मामा हे काही नातेवाईकांची नावे नाहीत. तर या आहेत फॅन्सी नंबर प्लेट. फडफड आवाज करत असलेली बुलेट आणि तिच्यावर असलेली अशी नंबरप्लेट हे चित्र तुम्ही अनेकदा पाहिले असेल. सध्या फॅन्सी नंबरप्लेटचे फॅड आलंय. त्यासाठी अनेकदा फाईन भरावा लागतो. पण, कायद्यात या गोष्टीला थारा नाही

वाहन कायद्यानुसार वाहकाला त्याच्या गाडीचा क्रमांक पुढील आणि मागील बाजूस लावला पाहिजे. सर्व नंबर प्लेट्स पटकन लक्षात येतील अशा अक्षरात असणे आवश्यक आहे. पण, भारतीयांना आमच्या मालकीची प्रत्येक वस्तू सजवायला आवडते, वाहनाची नंबर प्लेट हा अपवाद नाही. रस्त्यावर चालत असताना आम्ही सर्वांनी अनेक स्वयंघोषित BOYZ,SAI,BOSS,DADA अश्या नंबर प्लेट पाहिल्या आहेत. या असंख्य शब्दांसह जे वेगवेगळ्या अक्षरात लिहिलेले दिसतात.बहुतेक प्रकरणांमध्ये दिशाभूल करणारे नंबर प्लेट आढळलया आहेत.

फॅन्सी नंबर प्लेट्सना परवानगी का दिली जात नाही?जेव्हा एखादी कार पोलिस चेकपोस्ट ओलांडून, रात्रीच्या वेळी तपासणीसाठी न थांबता वेगाने जाते. या कारचे तपशील लक्षात घेण्यासाठी, अधिकारी कारचा रंग आणि नोंदणी क्रमांक पाहण्याचा प्रयत्न करेल. रात्रीची वेळ असल्याने रंग स्पष्टपणे ओळखता आला नाही.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की,ज्या वाहनांची फॅन्सी नंबर प्लेट असेल तर त्या गुन्हेगाराला पकडणं शक्य होत नाही. कारण त्या गाडीचा नंबर ओळखत येत नाही , हि गाडी कोणाची आहे हे त्या गाडीचा नंबर नीट दिसला तर लगेच कळते हि गाडी कोणाच्या नावावर आहे . अपहरण, खून, विनयभंग, चेन किंवा मोबाईल फोन स्नॅचिंग यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर केला जातो. अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे की अशा गुन्ह्यांमध्ये एक सामान्य घटक म्हणजे फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनाचा वापर पोलिसांना त्यांच्या मागावरून दूर फेकण्यासाठी केला जातो.

प्रतिक्रिया: मा.महेश पाटील
पोलीस निरीक्षक, जामखेड पोलीस स्टेशन
बिगर रजिस्ट्रेशन व नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनानवर केली कारवाई अशा प्रकारचे वाहन चालवताना अँक्सीडेंट झाल्यानंतर त्या फॅमिलीला इन्शुरन्स मिळत नाही. त्यामुळे विना रजिस्ट्रेशन वाहन रस्त्यावर कोणीही चालू नये जर अशा प्रकारचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्या व्यक्तीला दंडाची रक्कम भरून रजिस्ट्रेशन करावे
याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील,पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, काॅन्स्टेबल सचिन देवढे,काॅन्स्टेबल दत्तू बेलेकर,काॅन्स्टेबल ईश्वर परदेशी, काॅन्स्टेबल प्रकाश जाधव,काॅन्स्टेबल विजय सुपेकर ,काॅन्स्टेबल दिनेश गंगे आदी उपस्थित होते.
