Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आ.प्रा. राम शिंदे यांची दमदार कामगिरी; कर्जत -जामखेड मतदारसंघासाठी 26 कोटींचा भरीव निधी आणला खेचून !

आ.प्रा. राम शिंदे यांची दमदार कामगिरी; कर्जत -जामखेड मतदारसंघासाठी 26 कोटींचा भरीव निधी आणला खेचून !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 20, 2023Updated:March 20, 2023No Comments4 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

कर्जत-जामखेड : आमदार प्रा.राम शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. याला मोठे यश मिळाले आहे. सरकारकडून तब्बल 26 कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत – जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आमदार राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांना निधी मिळावा यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. या पाठपुराव्याला आता मोठे यश येताना दिसत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील 8 रस्त्यांसाठी तब्बल 26 कोटींच्या निधीस सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य लेखाशिर्ष योजना 5054 (03) अंतर्गत ही कामे 2023-24 च्या अर्थसंकल्पात मंजुर झाली आहे. यामध्ये जामखेड तालुक्यासाठी साडे अकरा कोटी तर कर्जत तालुक्यासाठी साडे चौदा कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.

आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे 2023 -24 च्या अर्थसंकल्पात मंजुर झालेली कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामे खालीलप्रमाणे

1) करमाळा – नान्नज- जामखेड- साकत – पाटोदा रस्ता रामा 56 किमी 19/800 ते 20/400 मध्ये सुधारणा करणे (भाग जवळा ते बोर्ला व किमी 28 /00 ते 29/00 भाग धोंडपारगाव ते राजेवाडी ) या कामासाठी 1.5 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.

2) राममा 561 ते आष्टी – जामगाव- डोणगांव- अरणगांव- फक्राबाद- बावी – नान्नज- सोनेगाव- खर्डा रस्ता रामा 409 13/600 ते 14/600 मध्ये सुधारणा करणे (भाग अरणगाव) या कामासाठी 1 कोटी 30 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.

3) राममा 548 ते पाटोदा – कुसडगाव- आपटी – पिंपळगाव उंडा – सोनेगाव रस्ता रामा 408 किमी 0/00 ते 1/500 मध्ये सुधारणा करणे ( भाग राममा 548 D ते कुसडगाव) या कामासाठी 1 कोटी 70 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.

4) राममा 548 ते पाटोदा – कुसडगाव- आपटी – पिंपळगाव उंडा – सोनेगाव रस्ता रामा 408 किमी 16/00 ते 18/00 मध्ये सुधारणा करणे ( भाग घोडेगाव ते पिंपळगाव उंडा ) या कामासाठी 2 कोटीचा निधी मंजुर झाला आहे.

5) राममा 548 ते पाटोदा – कुसडगाव- आपटी – पिंपळगाव उंडा – सोनेगाव रस्ता रामा 408 किमी 24 /600 ते 30/600 मध्ये सुधारणा करणे ( भाग पिंपळगाव उंडा ते सोनेगाव) या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे.

6) बनपिंप्री तालुका हद्द ते निमगाव गांगर्डा – बेलगाव- कोकणगाव- रवळगाव – गुरवपिंप्री – चांदे खुर्द – वालवड – रेहकुरी – नांदगाव – दुरगाव- पिंपळवाडी – बारडगाव दगडी – बारडगाव सुद्रिक रामा 68 रस्ता रामा 407 किमी 21/ 00 ते 26/800 सुधारणा करणे ( भाग प्रजिमा 100 रोटेवाडी ते गुरवपिंप्री ) या कामासाठी 6 कोटींचा निधी मंजुर झाला आहे.

7) कोपरगांव- राहुरी – अहमदनगर- करमाळा रोड प्ररामा 08 (रा.म.म 516 अ) किमी 49/400 ते 53/400 मध्ये सुधारणा करणे ( भाग मिरजगाव गावातील लांबी) या कामासाठी 5 कोटीचा निधी मंजुर झाला आहे.

8) कर्जत – कोरेगाव – चापडगांव- चोंडी – हळगाव- रस्ता रामा 405 किमी 15/200 ते 17/00 मध्ये सुधारणा करणे ( भाग चापडगांव गावाजवळील लांबी) या कामासाठी 3 कोटी 50 लाखांचा निधी मंजुर झाला आहे.

आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून गेल्या महिनाभरापासून मतदारसंघातील रस्त्यांसाठी भरीव निधी मंजुर होऊ लागला आहे. यापुर्वी मतदारसंघात 51 कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजुर झाला होता, आता आणखीन 26 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठ्या प्रमाणात कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत, त्या कामांना निधी द्यावी अशी मागणी या भागातील जनतेकडून सातत्याने होत होती, या मागणीची दखल घेऊन आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारकडे जोरदार पाठपुरावा हाती घेतला होता. याला आता मोठे यश आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यांच्या कामांसाठी 26 कोटींचा निधी मंजुर केला आहे. यामुळे या भागातील जनतेकडून सरकारचे आणि आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरसेवकाने केलेल्या गोळीबारातून दोन ठार; एक गंभीर जखमी.!
Next Article पाथर्डी| चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास ६१ क्विंटल साखर अर्पण- आमदार मोनिकाताई राजीव राजळे
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.