जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
आज रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती जामखेड येथे गुडीपाडव्या निमित्त जामखेड तालुका कृती समिती व आनंद ऋषी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त वि विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच दिपप्रज्वलन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक महेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे, अधिक्षक डॉ.शशांक वाघमारे, गट शिक्षणाधिकारी कैलास खेरे, श्री अशोक शेळके ,सुनील मिसाळ, दशरथ कोपनर ,प्रवीण गायकवाड, ज्योती पवार मॅडम शोभा कांबळे मॅडम ,शिवाजी हजारे (तलाठी), अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत,विश्वस्त मुकूंदराज सातपुते, शिक्षक नेते राम निकम, ग्रामसेवक अनिल आटोळे, बबन बहिर , सुरेश मोहिते आदी तसेच रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबीरामध्ये ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच या शिबीरामध्ये माहिलांनीही रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी जामखेड तालुका कृती समिती चे अध्यक्ष युवराज पाटील, सचिव ज्ञानेश्वर कोळेकर ,प्रवीण शिंदे, अमोल पवार ,रामहरी बांगर, विजयराज जाधव ,अविनाश नवसरे ,केशव कोल्हे व कृती समिति चे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
हे नक्की वाचा: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्यादाच एवढा स्वस्त मिळतोय iPhone, आहे मोठी सूट; वाचा काय आहे ऑफर
या रक्तदान शिबीरासाठी विशेष सहकार्य सुनिल महानोर,डाँ.शंकर मोरे, विशाल जाधव,समिर बेग आदी.
तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी तर आभार बापूराव माने यांनी मानले .
