Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्यावतीने महिलांचा सन्मान; महिलांना दररोज सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे- रूपालिताई चाकणकर

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्यावतीने महिलांचा सन्मान; महिलांना दररोज सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे- रूपालिताई चाकणकर

mahalokwaniBy mahalokwaniMarch 31, 2023Updated:March 31, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर शहर प्रतिनिधी:- विजय मते

नगर – वर्षातील 365 दिवस माझ्या भगिनी, महिला कुटूंबातील जबाबदारी पार पाडून, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करुन वेळप्रसंगी अन्यायाला, अपमानाला सामोरे जाते. महिलांमध्ये सहनशक्ती असल्याने त्या निमुटपणे सारेकाही सहन करतात ते केवळ कुटूंबाच्या भल्यासाठी. परंतु महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्याय सहन न करता दाद मागितली पाहिजे.

महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली असून, महिलांना 100 टक्के न्याय देण्याची आयोगाची भुमिका राहिली आहे. समाजानेही महिला दिनीच महिलांचे गुणगान न करता महिलांचा दररोज आदर, सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी केले.

सावेडी उपनगरात संदेशनगर येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करुन कुटूंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार्या महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी

रुपालीताई चाकणकर, आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, अभिजित खोसे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना रुपालीताई म्हणाल्या, महिलांनी निर्भिडपणे समाजात वावर करा, अन्याय सहन करु; नका. ना.शरदचंद्र पवार साहेबांनी महिलांसाठी राज्यास्तरावर खूप मोठे काम केले आहे. सुप्रियाताई सुळे यांचा आदर्श घ्या. प्रभागात नगरसेवक म्हणून काम करतांना सुनिल त्र्यंबके यांचे कार्य आज राज्यात चर्चा होत आहे. साई-संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे होणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे सांगितले.

आ.संग्राम जगताप म्हणाले, रुपालीताई चाकणकर यांच्या कार्याची माहिती देऊन राज्य आयोगाच्या अध्यक्षपदामुळे महिलांना त्या न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विविध जिल्ह्यातील अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या माध्यमातून करत आहेत. त्यांनी आपल्या कामातून वेगळा ठसा उमटविला आहे, असे आ.जगताप म्हणाले

प्रास्तविकात नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चांगले काम करण्याची प्रेरणा साईबाबांच्या आशिर्वादाने मिळत आहे. आज जे काही चांगले काम येथे होत आहे ते मी बाबांचा आर्शिवादाने. आ.संग्राम जगताप यांचे पाठबळ आहे, असे श्री.त्र्यंबके म्हणाले.
यावेळी सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते कर्तुवान महिलांचा तसेच बचत गटाच्या 167 महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक, संस्थांतील कर्मयोगिनी महिलांमध्ये स्नेहालय बालगृहातील जयश्री शिंदे, आश्विनी दोरवडे, दिपाली झांजड, आश्विनी आढाव, पोर्णिमा माने, सुमन कांबळे, शुभांगी झेंडे, सुजाता खेडकर, जया पालवे, क्राीं पोळ, शबाना शेख आदिं महिलांचा साई प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला.आभार माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी मानले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केले तर आभार योगेश पिंपळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये आष्टेकर मोबाइल शॉपीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.!
Next Article छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ विरोधात गौरवयात्रा, काय घडणार?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.