Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा ; आमदार प्रा. राम शिंदें व सैराट फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा उपस्थित

जामखेडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा ; आमदार प्रा. राम शिंदें व सैराट फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा उपस्थित

mahalokwaniBy mahalokwaniApril 1, 2023Updated:April 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

जामखेड – श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने जामखेड शहरात विविध मर्दानी खेळ बरोबरच अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिरात पुजलेल्या राम सिता व हनुमानच्या मुर्ती तसेच श्रीरामाचा भव्य पुतळा पालखीत घालून मिरवणूक काढण्यात आली. पाच तास चाललेली मिरवणूक शांततेत पार पडली. सकल हिंदू समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम जयंती निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिध्दीविनायक मंदीरापासुन मिरवणूकीची सुरवात हनुमान चालीसाचे सार्वजनिक पठण करून सुरवात झाली. मिरवणूकीत मध्यप्रदेश मधून आलेली पथके सहभागी झाले होते. मुली व महिलांनी दांडपट्टा प्रात्यक्षिक करून प्रेक्षकांचे मने जिंकली. लाकडी खांब व दोरीवरचे मल्लखांब प्रात्यक्षिक, ढाल तलवार,अश्वदल,घोड्यांवर मावळ्यां च्या वेशात लहान मुले,मुली तसेच वारकरी, टाळपथक,हलगी पथक, प्रात्यक्षिक, अघोरी बाबाची वेशभूषा केलेले पात्र, श्रीरामाची प्रतिकृती असलेली पालखी व अयोध्यातून आणलेल्या मुर्ती तसेच डिजेच्या तालावर थिरकलेली तरूणाई यामुळे मिरवणुक डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.


श्रीरामनावमी निमित्ताने जामखेड शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. मिरवणूक चालू असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बाजार सलग पाच तास चाललेली मिरवणूक बाजार समिती, बीड रोड, छत्रपती शिवाजी महाराज पेठ मार्गे संविधान चौकातील लक्ष्मी मंदिर येथे मिरवणूकीचे विसर्जन करण्यात आले.

या मिरवणुकीसाठी आमदार प्रा.राम शिंदे,सैराट फेमअभिनेते सुरेश विश्वकर्मा,माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर,उद्योगपती दिलीप गुगळे,आंनद गुगळे, संतोषशेठ फिरोदिया,प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी, डाँ.प्रकाश खैरनार,ज्ञानेश्वर अंदूरे,पोपट राळेभात,सोमनाथ पाचरणे,भाजपा शहराध्यक्ष बिभिषण धनवडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, उपाध्यक्ष मोहन मामा गडदे,संजय राऊत सर,बापुराव ढवळे ,महेश नगरे, राजेश मोरे,गोरख घनवट,मोहन देवकाते,सचिन मासाळ, उध्दव हुलगुंडे आदी व्यापारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामनावमी जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. एकनाथ मुंडे, विवेक कुलकर्णी, अजय काशीद, अमित चिंतामणी, बबलू टेकाळे,डिगांबर राळेभात, साहील भंडारी, दिपक ददियाल, कृष्णा बुरांडे, सुरज निमोणकर ,ऋषिकेश मोरे,आदींनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleछत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ विरोधात गौरवयात्रा, काय घडणार?
Next Article राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या; धारदार शस्त्रांनी सपासप वार.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.