Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जामखेड शहरातील रत्नदीप मेडिकल फौंडेशन व रिसर्च सेंटर या संस्थेच्या अध्यक्ष्यांनी कॉलेजच्या परिसरात असलेल्या आपल्या कार्यालयात एका एकोणीस वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दि. 4 मे रोजी त्या तरुणीने धाडस दाखवत जामखेड पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली आहे. परंतु पोलिसांनी आरोपीला अटक न करता पुरेसा वेळ दिला दि. 11 मे २०२३ पर्यंत आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही त्यामुळे सदर व्यक्तीला तातपुरता जामीन मिळाला आहे. हे स्पष्ट दिसत आहे .

त्या विद्यार्थिनीने धाडसाने सुटका करून घेतली नसती तर ती त्या संस्थेच्या अध्यक्ष्यांच्या अत्याचाराला बळी पडली असती . इतकी भयंकर घटना घडली असताना जामखेडकर गप्प आहेत . आज ही मुलगी बाहेर गावची आहे , दुसऱ्या जातीची आहे . अध्यक्ष आपला नातेवाईक मित्र आहे. म्हणून सर्व जण गप्प आहोत असेच मनावे लागेल .

या जागेवर असे कृत्य करणारा नराधम दुसरा असता तर हे कर्जत – जामखेडचे दोन्ही आमदार गप्प बसले असते का? या दोन्ही आमदारांनी महिला दिनाचे कर्जत – जामखेड मध्ये खूप मोठे -मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत , मग आत्ताच असे काय झाले कि, एवढी मोठी घटना घडली तरी हे दोन्ही आमदार गप्प आहेत? असा सर्वसामान्य कर्जत – जामखेड तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे ? हे दोन्ही आमदार या विषयावर आपले मत कधी व्यक्त करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सर्व स्थरातील लोकांना अध्यक्ष्यांची प्रवृत्ती माहित आहे . अशा पाच ते सहा घटना अगोदर घडल्या आहेत . तर या कॉलेजच्या दोन मुलींनी या अगोदर काही महिण्यापुर्वी आत्महत्या केलेल्या आहेत, या आत्महत्या पण संशयाच्या भोऱ्यात आहेत, मात्र या विद्यार्थिनीने पुढे येऊन तक्रार दिली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी जामखेडकरांनी पुढे आले पाहिजे .

सर्वात भयंकर म्हणजे जेव्हा घटना घडली तेव्हा अध्यक्ष्यांनी आपल्या जामखेड मधील दोन नामंकित पत्रकार मित्रांना फोन केले त्यातील एक पत्रकाराने तातडीने पोलीस स्टेशन गाठले . ” आपल्या मित्राला संभाळून घ्या बाकी सर्व व्यवस्था होईल ” असा निरोप दिला . अध्यक्ष्यांना पकडणे काहीच अवघड नव्हते . परंतु सर्व व्यवस्था झाली की, सर्वजण गप्प बसले असे दिसते . तर दुसऱ्या पत्रकार मित्रानी ही बातमी कोणत्याही वर्तमान पत्रात छापून येणार नाही याची जबादारी घेतली . व व्यवस्था केली ज्या प्रामाणिक पत्रकाराने ही बातमी दिली त्यांना पत्रकार सघातून ताबडतोब काढून टाकले.

या सर्व प्रकरणात अध्यक्ष्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे . जामखेड ची जनता ,समाजिक कार्यकर्ते सर्व गप्प बसले आहेत . आपल्या कुटूंबातील मुलगी असती तर असेच जामखेडचे सामाजिक ,राजकीय ,धार्मिक क्षेत्रातील लोक गप्प बसले असते का ? एरव्ही थोड्या थोड्या गोष्टी वर आंदोलन करणारे ,मोर्चा काढणारे मुलीच्या इज्जतीला हात घातला तरी गप्प का बसलेत हा मोठा प्रश्न आहे . हे सगळेच कसे मॅनेज झाले हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे . महाराष्ट्रातील महिला आयोग पण या प्रकरणात का शांत आहे , का त्यांच्या पर्यंत हा विषय जाऊ दिला नाही , जर गेलाच तर त्या या प्रकणावर काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे , राज्य पातळीवर काम करणाऱ्या युवती नेतृत्व हा मुद्दा राज्य महिला आयोगा कडे मांडणार का ? येत्या २४ मे रोजी जामीनावर निर्णय होणार आहे ,

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.