सध्या सर्रास सर्वच वयोमानातील लोकांना मूळव्याधाचा त्रास सहन करावा लागत आहे .
मूळव्याधीची Piles मुख्य लक्षणे:
परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवू शकतात –
- गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूज येणे

मूळव्याध Piles होण्याची कारणे:
मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो –
- वाढलेले वजन
- ४५ वर्षांपेक्षा जास्त वय
- गर्भावस्था
- अनुवांशिकता

आपल्या गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी करून डॉक्टर मूळव्याधीचे निदान करतात. गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी प्रथम डॉक्टर आपल्या गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस काही मूळव्याधीचे कोंब आहेत हे तपासतात, त्यानंतर आतील बाजू तपासली जाते. या तपासणीला DRE (Digital Rectal Examination) म्हणतात.

प्रोक्टोस्कोपी:
काही वेळा प्रोक्टोस्कोप वापरुन पुढील आंतरिक तपासणी करणे आवश्यकअसते. प्रोक्टोस्कोप ही एक पोकळ नळी असते. प्रोक्टोस्कोप रुग्णाच्या शौचाच्या जागेतून आत घातला जातो त्यामुळे आतील भागाची तपासणी करता येते.
कोलोनोस्कोपी:
काही वेळा कर्करोग किंवा मोठ्या आतड्याचा इतर काही त्रास नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टर आपल्याला कोलोनोस्कोपी किंवा एन्डोस्कोपीचा सल्ला देऊ शकतात.

मूळव्याधीचे प्रकार:
गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी किंवा प्रोक्टोस्कोपीनंतर डॉक्टर रुग्णाला कोणत्या प्रकारची मूळव्याध आहे सांगू शकतात.
- पहिली पायरी – गुदद्वाराच्या आतील बाजूस आलेली लहान सूज / कोंब. ही सूज बाहेरून दिसत नाही.
- दुसरी पायरी – गुदद्वाराच्या आतील बाजूस आलेली थोडी मोठी सूज / कोंब. शौचाच्या वेळी ही सूज बाहेर येते.
- तिसरी पायरी – गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या एक किंवा अधिक लहान गाठी. या गाठी पुन्हा आत ढकलता येतात.
- चौथी पायरी – गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या एक किंवा अधिक थोड्या मोठ्या गाठी. या गाठी पुन्हा आत ढकलता येत नाहीत.
मूळव्याधीचा प्रकार समजून घेणे हे सर्वोत्तम उपचारासाठी आवश्यक आहे.

मूळव्याधीवरील उपचार:
मूळव्याधीचा त्रास बरेचदा कोणत्याही उपचाराशिवाय काही दिवसात बरा होतो. परंतु गुदद्वाराजवळील खाज आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. सर्वप्रथम आहारातील बदल आणि शौचाच्या वेळी जोर न करणे हे सांगितले जाते. आहारातील बदल व स्वतः घ्यायची काळजी

- यासाठी आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवावे – फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.
- भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे
शौचाच्या वेळी खालील काळजी घ्यावी –
- शौचाच्या वेळी कुंथू नये / जोर करु नये.
- शौचानंतर मऊ toilet paper वापरावा
- शौचानंतरची स्वच्छता हळुवारपणे करावी.