Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगर- मधील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पुजारी यांच्या घरी पलंगाचे भव्य स्वागत

नगर- मधील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पुजारी यांच्या घरी पलंगाचे भव्य स्वागत

mahalokwaniBy mahalokwaniOctober 17, 2023Updated:October 17, 2023No Comments4 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महेश कांबळे

नगर- मधील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे मुख्य पुजारी असलेले व पलंगाचे मानकरी पलंगे यांच्या येथे पलंगाचे भव्य स्वागत व पूजा करण्यात यावेळी बाबुराव पलंगे,अनंत पलंगे,गणेश पलंगे,उमेश पलंगे सह भाविक मोठ्या संख्नेने उपस्तित होते.पलंगे कुटुंब मानकरी असलेल्या व सुमारे ८०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा प्रवास हा खूप थक्क करणारा आहे श्री.तुळजाभवानी मातेचा पलंग हा बनविण्याचा मान मूळचे घोडेगाव (भिमाशंकरजवळ) असणारे ठाकूर (कातारी) कुटुंबियांना आहे.

पलंगाचे कातीव कामासाठी आंब्याचे आणि सागवान लाकुड, रंगकाम कामाकरिता लाखाचे रंग, लोखंडी साहीत्य खिळे पट्टी,सुती नवार पट्टी,दोरखंड,गादीसाठी कापुस,छताकरिता कापड तसेच इतर लागणारे सर्वे काही साहित्य ही जबाबदारीने अहमदनगर येथील पलंगे (तेली) घराण्याकडुन ठाकूर कुटुंबियांना पुरवले जातात.पलंग घोडेगाव मध्ये बनवून पूर्ण झाल्यावर त्याच्यावर दोरखंडाची बांधणी पलंगे कुटुंबियांकडून केली जाते आणि मग तो पलंग पुणे जिल्ह्यात फिरून नगर जिल्ह्यात आला.

Royal Enfield| बुलेट प्रेमींसाठी खास सणासुदीची भेट, रॉयल एनफील्ड नव्या लूकमध्ये

तुळजाभवानी मातेचा पलंग खांद्यावर डोक्यावर वाहून पायी तुळजापूरला नेण्याची परंपरा आहे. नगरमधून श्री तुळजाभवानी मातेचा पलंग बीड जिल्हा,सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा असा नवरात्रीची तिसरी माळ ते नवरात्राची नववी माळ अशी ७ दिवस २४ तास म्हणजे दिवस-रात्र प्रवास करत असतो.नगरलगत असणारी लोणी सय्यदमीर, कुंटेफळ, चिंचोडी पाटील,कुंडी या चार मानाच्या गावचे भक्त पलंगासोबत सेवा करण्याचे काम करत असतात.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानक-यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर प्रशासनालाही त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही. त्याचे कारण म्हणजे सेवा बजावण्याच्या मानपानातील असणारी गुंतागुंत.

तसे पाहिल्यानंतर देवाचा पलंग असो की पालखी या दोन्ही धार्मिकदृष्ट्या पवित्र असल्याने आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर वापर झाल्यानंतर त्या वस्तू मंदिरातच कुठे तरी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवून पुन्हा त्याचा वापर केला जातो. याच्या उलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही वस्तू एकदा वापर झाल्या की त्या सन्मानपूर्वक तोडून होमात टाकून जाळून टाकल्या जातात.

तसं पाहिलं तर तुळजाभवानीच्या सर्वच प्रथा आणि परंपरा इतर देवस्थानांपेक्षा अतिशय भिन्न आहेत. कारण हिंदू धर्मात तुळजाभवानीच्या मूर्तीशिवाय इतर कुठलीही मूर्ती नसेल जी प्रत्यक्षपणे काढून मूळ मूर्तीलाच पालखीत ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. शिवाय वर्षातून तीन वेळा मूळ मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविली जाते. तुळजाभवानीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूरमध्ये तेलाचा घाणा पूर्वापारप्रमाणे चालवायला परवानगी नाही. तर आश्चर्याची बाब म्हणजे याच तुळजाभवानीला लागणारा पलंग आणि पालखी घेऊन येण्याचा मान नगर जिल्ह्यातील तेल्याचा आहे.

आपण तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभा-यात गेल्यानंतर उजव्या हाताला एका ओवरीत देवीचा पलंग दिसतो. त्या पलंगावर देवीची मूळ मूर्ती काढून भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावास्या, अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा व पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत झोपविली जाते. याला देवीची घोर निद्रा, श्रमनिद्रा व भोग निद्रा म्हटली जाते. तर सीमोल्लंघनासाठी तीच मूर्ती पालखीत ठेवून मुख्य मंदिराभोवती मिरविली जाते. विशेष म्हणजे पालखी सीमोल्लंघनानंतर लगेचच तोडून होमात टाकली जाते.

तर दस-यानंतरच्या पौर्णिमेदिवशी जुना पलंग होमात टाकून नवा पलंग ठेवला जातो. तुळजापुरातील मराठा समाजातील एका घराण्याकडे या पलंगाची सेवा करण्याची परंपरा असल्याने त्याचे आडनाव पलंगे पडले आहे. पलंग व पालखी या दोन्ही वस्तू देवीसाठी महत्त्वाच्या असल्या तरी त्या आणण्याचा मान हा अहमदनगरच्या तेली समाजाचा आहे. यातही पुन्हा वेगळेपण म्हणजे तेली मानकरी असले तरी त्या वस्तू भलत्याच जागी तयार होऊन कशाप्रकारे तुळजापूरपर्यंत पोहोचतात हा सर्व प्रवासच अनोखा.

तुळजाभवानी देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान परंपरेने अहमदनगर शहरातील तेली समाजातील पलंगे घराण्याला आहे. सध्या बाबूराव आंबादास पलंगे याचे मुख्य मानकरी असून नगर शहरातील तुळजाभवानी मंदिराचे ते पुजारी आहेत. तुळजापूरप्रमाणे इथेही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. देवीचा पलंग तुळजापूरला घेऊन येण्याचा मान भलेही पलंगे घराण्याला असला तरी तो तयार करण्यासाठी राबणारे हात दुसरेच आहेत. प्रत्यक्षात देवीचा पलंग तयार करण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर घराणे परंपरेने करत असते. श्रद्धापूर्वक पलंग तयार करून दिल्यानंतर पुन्हा ठाकूर यांचे काम संपले.

बिचारे तुळजापुरात आल्यानंतर त्या पलंगापर्यंत जायचे म्हटले तर त्याला परवानगी नाही. कारण पलंग तयार केल्यानंतर तो नगरच्या पलंगे नावाच्या तेली समाजातील मानक-याच्या ताब्यात देतो. तेथून तो तुळजापूरच्या दिशेने रवाना होतो.

घोडेगावावरून वाजत-गाजत पलंगाचा प्रवास महिनाभर सुरू असतो. या दरम्यान तो जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, पारनेरमार्गे नगरपर्यंत प्रवास करत असतो.
फोटो-तुळजाभवानी देवीचा पलंग नगर मुक्कामी आला असून तो नगर शहरात सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आल्यावर पलंगे कुटूंबीयांकडून पूजा करण्यात आली यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWorldcup2023| पाच वेळा चॅम्पियन बनलेला संघ पहिल्यांदाच गुणतालिकेच्या तळाशी; ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय चुकतंय ?
Next Article नगरसेवक बिभिषण धनवडे यांच्या माध्यमातून माहिलांसाठी मोहटा देवी दर्शन यात्रेचे आयोजन
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.