राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक राहिलेले पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. अनंत करमुसे प्रकरणी वैभव कदम यांची सतत चौकशी सुरू होती. त्यानंतर अचानक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. वैभव कदम हे काही काळ जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक होते. अनंत करमुसे प्रकरणात वैभव यांची सतत चौकशी सुरू होती. आज अचानक वैभव यांनी आत्महत्या केली. वैभव यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. वैभव कदम असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज सकाळी वैभव कदम यांनी रेल्वेसमोर उडी मारून…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये जामखेडची नूतन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सन्मान सोहळा व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचा सन्मान करण्यात आला. अभ्यास अभ्यासात नेहमी सातत्य ठेवावे , शिस्त – स्वतःला शिस्तबद्ध ठेवावे, चालताना बोलताना शिस्तीत राहावे, सुसंस्कार – आई-वडिलांकडे आदर करावा वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा , व्यायाम – ज्याची शारीरिक क्षमता चांगली आहे तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातो आणि यशस्वी होतो चांगले आरोग्य असेल तर चांगला अभ्यास करू शकाल . महापुरुषांची जयंती डी जे न लावता अभ्यास करून साजरी करावी .आम्ही पुणे विद्यापीठामध्ये अभ्यास करत असताना…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड मधील नामांकित असणारी मोबाईल शॉपी म्हणजेच आष्टेकर मोबाईल शॉपी आता गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी, नव्या वास्तूत नव्या रूपात जामखेड करांच्या सेवेत दाखल होत आहे . बीड रोड कॉर्नर, बोथरा कॉम्प्लेक्स कॉटनकिंग- डेनिमस्टार शेजारी जामखेड, या ठिकाणी सुरवात होत आहे, मोबाईल क्षेत्रातील सर्व काही आता एका छताखाली उपलब्ध करण्यात आले आहे ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टेकर मोबाईल शॉप मध्ये सर्व कंपन्यांचे मोबाईल आयफोन व सर्व मोबाईल सर्व मोबाईलची एसेसरीज उपलब्ध आहे आष्टेकर बंधूंनी आपली सुरुवात अत्यंत शून्यातून निर्माण केलेले आहे ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी संपूर्ण जामखेड करांचा विश्वास…
मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी एसटी संपाच्या आंदोलनात वकिलीचा कोट घालून भाग घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची वकिली दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सीलने हा निर्णय घेतला आहे. सदावर्तेंनी आंदोलनामध्ये भाग घेताना बार कौन्सिलच्या नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार अॅड. सुशील मंचरकर यांनी केली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. Gunratna Sadavarte: सदावर्तेंची वकिली का निलंबित करण्यात आली? एसटी आंदोलनात त्यांनी वकिलांचा ड्रेस परिधान करून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात डान्स केला, त्यानंतर त्यांनी एक बैठक बोलवूनही बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तशी तक्रार एक…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड पोलीस स्टेशन येथे आज रोजी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत विविध सण तसेच महापुरूषांची जयंती साजरी करताना काही अडचणी येऊ नये तसेच उपाययोजना कराव्यात. या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी ,कर्जत जामखेड विधान सभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले,मौलाना खलील, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, नगराध्यक्ष निखिल घायतडक, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद,भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, उपाध्यक्ष सनि सदाफुले,मंगेश आजबे,काँग्रेसचे राहुल उगले , वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अतिश पारवे,शिवप्रतिष्ठाणचे…
अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पिकअपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडले असून, यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दाेन चिमुकले, दाेन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे इथं जात असणाऱ्या शेतमजुरांना हा अपघात झाला आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी इथं हा अपघात झाला आहे. अपघातातील सर्व शेतमजूर आहेत. सुंदराबाई (वय २८ ), गौरव मधे (वय ५ ), नितीन मधे (वय २५ ) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. हे सर्व शेतमजूर पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे…
पुणेः भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे सकाळपासून हरवलेले वडील महादेव जाधव अखेर मुंढवा पोलीस स्टेशन जवळ सापडले आहेत. पुण्यातील कोथरूड भागातून क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडील बेपत्ता झाले होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाले होते. दिवसभर शहर पोलिस दलातील पाच पथकाकडून तपास घेण्यात येत होता. केदार जाधव यांचे कुटुंबीय कोथरूड भागात राहतात. महादेव जाधव हे सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेऊन गेले, मात्र रात्रीपर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नव्हता. त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोनही बंद लागत होता. त्यांचा काहीच संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.अखेर केदारचे वडील महादेव जाधव मुंढवा…
IPL Rules 2023 : IPL 2023 च्या 16 व्या सीजनला आता आठवड्याभराचा अवधी उरला आहे. दरवर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठा उत्साह असतो. या सीजनमध्ये ‘होम-अवे’ फॉर्मेट असणार आहे. म्हणजे यंदा सर्वच टीम आपलं होम ग्राऊंड आणि दुसऱ्या टीम्सच्या मैदानावर खेळणार आहेत. कोरोनाव्हायरसमुळे मागची तीन वर्ष ठराविक ग्राऊंडसवरच सामने झाले. यंदाच्या आयपीएलच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नियम. यंदाच्या आयपीएलमध्ये तुम्हाला नवीन नियम दिसतील. 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. तेव्हापासून हे नियम लागू होतील. आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी गुजरातचा कॅप्टन हार्दिक…
ITR Form-16 : तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तुम्ही ऐकलं असेल की कंपनीच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या पगारातून TDS कापला जातो. हा तुमचा TAX रेकॉर्ड आहे. मागील आर्थिक वर्षासाठी कंपनीकडून दरवर्षी मे अखेरीस फॉर्म-16 जारी केला जातो. जो १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंतच्या कालावधीसाठी असतो. फॉर्म 16 हे मूलत: एक प्रमाणपत्र आहे जे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना जारी करतं. हे प्रमाणपत्र तुमच्या पगारातून टीडीएस कापून कर्मचाऱ्याच्या वतीने सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा केल्याची मान्यता देतं. प्रत्येक कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिप देणं आवश्यक आहे. फॉर्म 16 मध्ये प्रत्येक महत्त्वाचा तपशील आहे जो आयकर रिटर्न भरण्यासाठी उपयुक्त आहे. याद्वारे तुम्ही टीडीएस म्हणून…
पाथर्डी प्रतिनिधी: सोमराज बडे अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आज (ता.२७)रोजी दुपारी १वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ता.पाटोदा,जि. बीड येथून वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे,सचिन नामदेव बडे यांचे संयुक्त विद्यमाने हेलिकॉफ्टर मधून चिंचपूर पांगुळ येथे आयोजित सप्ताहासाठी आणल्या आहेत. या प्रसंगी शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन ,तसेचभगव्या पताका घेऊन पुरुष लहान मुले सहभागी झाले होते.गावातून बँड, टाळ,मृदुगाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी एक वाजता हेलिकॉपटर ने मंडपावर…