सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा-भजन,रामकथा,दररोज रात्री कीर्तन ,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.उद्या (ता.३)रोजी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.त्यानंतर दुपारी १२वाजता संत वामनभाऊ यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याचे महंत विठ्ठल महाराज यांनी सांगितले आहे दरम्यान आज गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन ,तसेच भगव्या पताका घेऊन पुरुष लहान मुले सहभागी झाले होते.…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कर्जत-जामखेड : पायाला मार लागून अपघातात गंभीर झालेल्या कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या रूग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या रुग्णाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला होता. कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या 15 वर्षीय मुलाचा पाडव्याच्या आदल्या दिवशी मोटारसायकल अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. सदर रूग्णावर पुण्यातील संचेती हाॅस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. पायावरील शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च येणार होता.बिटके यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा खर्च भागवायचा कसा असा…
साई बाबांचं प्रति शिर्डी अर्थात मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंचांचा मृत्यू झालाय. या घटनेनं मावळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रवीण गोपाळे असं मयत सरपंचांचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केलेत या हल्ल्यानंतर गोपाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर तातडीनं त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला नेमका का करण्यात आला? हे हल्लेखोरांच्या अटकेनंतर स्पष्ट होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जमिनीच्या प्लॉटिंगमधून ही हत्या झाल्याचा पोलीसांना संशय आहे. प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. साधारण 9…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार जामखेड – श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने जामखेड शहरात विविध मर्दानी खेळ बरोबरच अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिरात पुजलेल्या राम सिता व हनुमानच्या मुर्ती तसेच श्रीरामाचा भव्य पुतळा पालखीत घालून मिरवणूक काढण्यात आली. पाच तास चाललेली मिरवणूक शांततेत पार पडली. सकल हिंदू समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम जयंती निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिध्दीविनायक मंदीरापासुन मिरवणूकीची सुरवात हनुमान चालीसाचे सार्वजनिक पठण करून सुरवात झाली. मिरवणूकीत मध्यप्रदेश मधून आलेली पथके सहभागी झाले होते. मुली व महिलांनी दांडपट्टा प्रात्यक्षिक करून प्रेक्षकांचे मने जिंकली. लाकडी खांब व दोरीवरचे मल्लखांब…
युती सरकारला आसमान दाखवण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. कोणत्याही कारणाने ही मूठ सैल पडू द्यायची नाही, असा चंग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बांधलाय. सत्ताधाऱ्यांविरोधातील रणशिंग फुंकण्यासाठी महाविकास आघाडीने संयुक्त संभांची घोषणा केली. मराठवाड्याचं प्रवेशद्वार संभाजीनगरातून पहिल्या सभेची घोषणा केली. २ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या सभेसाठी युद्धपातळीवर तयारी केली जातेय. मात्र त्याच दिवसापासून भाजपच्या गौरवयात्रेचंही आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राला उजाळा देण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक मतदारसंघात ही यात्रा आयोजित करण्याची घोषणा शिंदे फडणवीस यांनी केला. संभाजीनगरात ही गौरव यात्रा २ ते ५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २ एप्रिल रोजी संभाजीनगरात शिंदे-भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचं मोठं शक्तिप्रदर्शन होण्याची…
अहमदनगर शहर प्रतिनिधी:- विजय मते नगर – वर्षातील 365 दिवस माझ्या भगिनी, महिला कुटूंबातील जबाबदारी पार पाडून, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करुन वेळप्रसंगी अन्यायाला, अपमानाला सामोरे जाते. महिलांमध्ये सहनशक्ती असल्याने त्या निमुटपणे सारेकाही सहन करतात ते केवळ कुटूंबाच्या भल्यासाठी. परंतु महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्याय सहन न करता दाद मागितली पाहिजे. महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली असून, महिलांना 100 टक्के न्याय देण्याची आयोगाची भुमिका राहिली आहे. समाजानेही महिला दिनीच महिलांचे गुणगान न करता महिलांचा दररोज आदर, सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी केले. सावेडी उपनगरात संदेशनगर येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आष्टेकर बंधूंनी आपली सुरुवात अत्यंत शून्यातून निर्माण केलेले आहे ग्राहकांचा विश्वास आणि विश्वसनीय काम यातून सागर आष्टेकर यांनी संपूर्ण जामखेड करांचा विश्वास संपादन केला आहे , जामखेडकरांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर अष्टेकर मोबाईल शॉप आपल्या नवीन वास्तुत पदार्पण करीत आहे . गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी ११.०० वा श्रीमती मंगलताई सुरेश आष्टेकर व सौ मनिषा पुराणे मॅडम यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे,मंगेश दादा आजबे, नगरसेवक अमित चिंतामणी,पारनेर सैनिक बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील, डॉ. फारुख आझम…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या पक्क्या बांधकामधारकांना,व्यापारी वर्गाला नगरपरिषदेच्या वतीने कालपासून सरसकट,मोघम नोटिसा दिल्या जात असून,पुढील चार दिवसांत आपापले बांधकाम काढून घेण्याचे त्वरीत आदेश दिले आहेत.त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग हवालदिल झाले असून, त्यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.व्यापाऱ्यांच्या मते,जर डिव्हाडर,युटीलीटी एरिया कमी केला तर रस्ता नियोजनाप्रमाणेच होईल.शिवाय शहराचा कणा असलेली बाजारपेठही सुरक्षित राहिल. वास्तविक, नगरपरिषदेच्या वतीने नोटिसा देताना नँशनल हायवेच्या सध्याच्या नॉर्मप्रमाणे 15 मी.वरील संबंधितांना नोटिसा देणे आवश्यक असतानाही,त्या रेषेवरीलही मालमत्ता धारक,सीटी सर्वेला असलेल्या नोंदी,NA जागा अशी कोणतीही खातरजमा न करता सरसकट नोटीसा देऊन कहरच केला आहे.खरेतर नगरविकास किंवा नँशनल हायवेच्या कार्यालयामार्फत अधिकृत अधिग्रहण/मोबदला याबाबत काहीही…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड शहरातील श्रीराम मंदिर येथे श्रीरामरक्षा स्तोत्र मराठी भावानुवाद या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प.विजयकुमार बागडे सर, यांच्या शुभहस्ते तसेच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष उद्धवराव देशमुख रमेश चांदेकर सर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष : उध्दव बापू देशमुख ,शुभहस्ते : ह.भ.प.विजयकुमार बागडे सरश्री रमेश एकनाथ चांदेकर सर भावानुवादक सदानंद बाळकृष्ण होशिंग यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया सांगताना श्रीरामरक्षा या स्तोत्राची निर्मिती कशी झाली यावर सुंदर विवेचन केले. आणि यातूनच या संस्कृत स्तोत्राचा मराठी भावानुवाद करुन श्रीरामसेवेचे महत्व विषद केले. यावेळी उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, शशिकांत देशमुख, राजेश मोरे, ॲड.रमेश काळे, अभय किंबहुणे, योगेश देशमुख, विवेक…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे केंद्रीय रेल्वेमंत्री मा ना श्री अश्विनी वैष्णवजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर चर्चा केली तसेच विविध मागण्यांची निवेदने दिली त्यामध्ये प्रामुख्याने -छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी) – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दौंड जंक्शन स्थानकात थांबा देण्यात यावा. दौंड तालुक्यातील खुटबाव , कडेठाण व कानगाव येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात यावेत.दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे . सकाळी ६.१० वाजता दौंड वरून सुटणारी डेमू स्पेशल लोकल (गाडी क्र.०१५२२), सोलापूर – हडपसर पॅसेंजर (गाडी क्र. ११४२१) ) या गाड्या हडपसर स्थानकाऐवजी…