Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार आज रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती जामखेड येथे गुडीपाडव्या निमित्त जामखेड तालुका कृती समिती व आनंद ऋषी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त वि विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ‌याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच दिपप्रज्वलन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक महेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे, अधिक्षक डॉ.शशांक वाघमारे, गट शिक्षणाधिकारी कैलास खेरे, श्री अशोक शेळके ,सुनील मिसाळ, दशरथ कोपनर ,प्रवीण गायकवाड, ज्योती पवार मॅडम शोभा कांबळे मॅडम ,शिवाजी हजारे (तलाठी), अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत,विश्वस्त मुकूंदराज सातपुते, शिक्षक नेते…

Read More

जगभरात अ‍ॅपल आयफोनची (iPhone ) प्रचंड क्रेझ आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान, नवनवीन फीचर्स यामुळे आयफोननं आपली लोकप्रियता कायम राखली आहे. किंमत अधिक असली तरीही आयफोनचे चाहते रांगा लावून हा फोन खरेदी करतात. अलीकडच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनही याची ऑनलाइन (Buy Online iphone) खरेदी करता येते. त्यामुळे यासाठी आधीच नोंदणी केली जाते आणि फोन दाखल झाल्यावर तत्काळ त्याची खरेदी केली जाते. अशावेळी मोठ्या प्रमाणात सवलतही मिळू शकते. यंदा कंपनीनं आयफोन 13 दाखल केला असून, दाखल करताना त्याची किंमत 79,000 रुपये होती. हा फोन अवघ्या 56,000 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. हे फोन तुम्हाला तुमच्या जवळच्या मोबाईल शॉप, मॉल, मध्ये मोठ्या…

Read More

अहमदनगर येथील वसंत टेकडी , साईनाथ चौक नगर परिसरातील वार्ड क्रमांक दोन मधील नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या साईबाबा मंदिर परिसरात साई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य असा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे, तसेच या शहराचे लाडके आमदार. माननीय. संग्राम भैया जगताप या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. हा कार्यक्रम 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त 30 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे यासाठी वार्ड क्रमांक दोन मधील सर्व महिलांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे…

Read More

20 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी रणनीती आखली जात आहे. पण, ‘क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, मात्र चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. इंडियाच्या ‘चौपाल’ कार्यक्रमात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींना कुणीही पराभूत करू शकत नाही, असा सवाल केला असता गडकरी म्हणाले की, ‘क्रिकेट, व्यवसाय आणि राजकारणात काहीही होऊ शकते, मात्र चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे. मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात…

Read More

लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे. याविषयावर कॅमेऱ्यावर बोलण्यास तूर्तास भाजपचे कोणतेही नेते तयार नाहीत. 2024 च्या एप्रिल आणि मे महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर अवघ्या चार ते पाच महिन्यातच विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळही संपत आहे. म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका सोबत घेणे शक्य होणार आहे. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राज्य विधानसभेतही जास्तीत जास्त जागा मिळवता येऊ शकतात, असा प्रदेश भाजपमधील धुरीणांचा होरा आहे. म्हणूनच दोन्ही निवडणूका एकत्र घेण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याची…

Read More

अ.नगर – येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ञ व स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ चळवळीच्या आद्यप्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया या नांवाचे पोस्टाचे तिकीट इंडियन पोस्ट माय तिकीट अंतर्गत प्रकाशित झाले. औचित्य होते जागतिक महिला दिनाचे! अहमदनगर येथील वरीष्ठ पोस्ट अधिक्षक श्रीमती हनी गंजी यांच्या हस्ते डॉ. सुधा कांकरिया यांना तिकीट प्रदान करण्यात आले. श्रीमती हनी गंजी यांनी डॉ. सुधाताईंच्या सेवाभावी कार्याचे, चळवळीचे कौतुक करून अभिनंदन केले. सदर प्रसंगी डॉ. सुधाताई कांकरिया म्हणाल्या की सामाजिक चळवळीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकीटावर उमटले आहे. परमेश्वराचा प्रसाद समजून मी याचा स्विकार करते. 1985 पासून निरंतर स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ ही चळवळ कार्यरत आहे. यात हजारो व्यक्ती योगदान…

Read More

Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे व्यक्तिमत्व विशेष लोकप्रिय आहे. डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचं मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. आ.प्रा. राम शिंदे यांची दमदार कामगिरी; कर्जत -जामखेड मतदारसंघासाठी 26 कोटींचा भरीव निधी आणला खेचून ! त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यात डख यांच्या नावाचं वादळ गेल्या काही वर्षात पाहावयास मिळत आहे. राज्यात कदाचित असा एखादाच शेतकरी असेल ज्याला पंजाबराव हे नाव माहिती नाही. पण नुकतीच सोशल मीडियामध्ये पंजाबराव डख आणि नाशिकच्या एका शेतकऱ्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या ही कॉल रेकॉर्डिंग वेगाने व्हायरल होत…

Read More

सोमराज बडे: पाथर्डी प्रतिनिधीअहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दिनांक-२७ मार्च ते ३एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. शेवंगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी श्री वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून १२२ कट्टे (६१क्विंटल) साखर या होत असलेल्या सप्ताह कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात दान दिली आहे. चिंचपूर पांगुळ येथील संत वामनभाऊ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्ताच्या वतीने वृद्धेश्वर साखर कारखान्याचे प्रतिनिधी श्री म्हस्के व सहकारी यांचे आभार मानत शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे पाटील,सूर्यभान बडेसर, बंटी बडे,रावसाहेब गीते,नामदेव बडे,ननांवरे,…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार कर्जत-जामखेड : आमदार प्रा.राम शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. याला मोठे यश मिळाले आहे. सरकारकडून तब्बल 26 कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जत – जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आमदार राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांना निधी मिळावा यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. या पाठपुराव्याला आता मोठे यश येताना…

Read More

काही तासांपूर्वीच नाशिक शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गोळीबार झाला आहे. यात दोनजण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो माजी नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या दिसून येत आहे नाशिकची घटना ताजा असतानाच पुन्हा एकदा नाशिक सारखेच घटनाही सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुरेघर धरण परिसरात माजी नगरसेवकाने गोळीबार केला. यात दोनजण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. मदन कदम असं आरोपीचं नाव असून…

Read More