महालोकवाणी न्यूज: पुणे जिल्हा प्रतिनिधी :बबनराव धायतोंडे सालाबादप्रमाणे खानवटे तालुका दौंड (Daund) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते…आज शेवटच्या दिवशी काल्याचे सांगता किर्तन ह.भ.प. शिवचंद्र महाराज शेळके (आळंदी) यांचे झाले या किर्तनासाठी महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सप्ताहाचे दरम्यान 7 दिवस दररोज संध्याकाळी किर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले सप्ताहाचे नियोजन यावर्षी प्रथमच तरूणांनी हातात घेतल्याने ग्रामस्थांनी त्यांना आर्थिक मोठा प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पा घाडगे. रंगनाथ ढवळे. शरद नवले. बाळासाहेब गावडे. सुनिल शिरसट. सोमनाथ सावंत. कन्हेरकर यांनी विशेष योगदान दिले. व त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच अर्जुन शिरसट व विकास सोसायटीचे माजी चेअरमन…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारजामखेड शहरातील ल.ना. होशिंग विद्यालय येथे वार्षिक पारितोषीक वितरण पार पडले. आज रोजी ल.ना.होशिंग विद्यालय येथे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात या विद्यालयातून यश किशोर पवार हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता. तो एन. एम.एम. एस. परीक्षेत categery तून त्याने हे यश संपादन केले आहे.त्याबद्दल आज उपप्राचार्य पोपट जरे सर यांचे हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सैफुल्ला खान, संस्थेचे संचालक अशोक शिंगवी, प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपमुख्याध्यापक रमेश आडसुळ सर,माजी प्राचार्य अनंता खेत्रे सर, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे सर आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल युवा नेते…
महालोकवाणी न्यूज: पाथर्डी प्रतिनिधी: सोमराज बडे महाराष्ट्राचे माजी मंत्री (सामाजिक न्याय विभाग) व माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे Dhanajy Munde यांनी आज (ता.१२)रोजी सकाळी ११.३०.वाजता श्री क्षेत्र गहिनाथ गड चिंचोली ता.आष्टी जि. बीड येथे सद्गुरू गहिनाथ महाराज तथा गुरुवर्य संत वै.वामनभाऊ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान मुंढे यांचा काही दिवसांपूर्वी गाडीचा अपघात (Accident )झाला होता.त्यात ते जखमी झाले होते. डॉक्टरांनी त्यांना उपचारानंतर सक्तीची विश्राती घेण्यास सांगितले होते. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर कामकाज सुरु करण्याआधी आपण संत वामनभाऊ तसेच गहिनीनाथ महाराज यांच्या समाधी स्थळचे दर्शन घेऊन तसेच महंत हभप.विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेऊन सामाजिक कामास सुरुवात करणार होतो.त्यामुळे आज गडावर आलो…
महालोकवाणी न्यूज: दि. 12 फेब्रुवारी 2023 जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर यांच्या सुचनेनुसार मा.प्रा.किसन चव्हाण (सर) उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भटके विमुक्त,आदिवासी,विविध सामाजिक संस्था संघटना,व भटके विमुक्त आदिवासी समाजातील विविध सामाजिक परिवर्तन राजकीय सत्ता ,आर्थिक,शैक्षणिक त्याचबरोबर गायरान जमीन,कल्याणकारी योजना,भटके विमुक्त आदिवासी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दि. हे पण वाचा Daund|दौंड हादरलं..राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळले..! 11फेब्रुवारी पासून औरंगाबाद,जालना,परभणी लातूर,हिंगोली, उस्मानाबाद,बीड,अश्या दौऱ्याची सुरुवात झाली या दौऱ्यास भटके विमुक्त व आदिवासी समाजातील उत्तम प्रतिसाद लाभत आहे अशी माहिती तुकाराम पवार आदिवासी…
महालोकवाणी न्यूज: भगतसिंह कोश्यारी यांनी , छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण Maharashtara राज्यात राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा ( Resign) आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उशिरा का होईना राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. नवे येणारे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत दहा वर्षे काम केलं आहे. त्यामुळे त्यांनाही जाऊन भेटणार आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा पण महापुरुषांच्या बद्दल केलेले भाष्य अतिशय दुर्दवी आहे. महाराष्ट्राच्या इतिहास नाही देशातच सुद्धा असे…
महालोकवाणी न्यूज:- पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना दौंड daund तालुक्यात समोर आलेली असून दौंड तालुक्याच्या पारगाव येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पारगाव येथील भीमा नदी पात्रात सात जणांचे मृतदेह आढळून आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीला आलेला होता त्यानंतर पुन्हा एकदा परिसरात आत्महत्येचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, विकास उर्फ भालचंद्र पोपट जगताप ( वय 42 ) आणि त्यांच्या पत्नी संगीता उर्फ राजश्री विकास जगताप ( वय 35 ) अशी पती-पत्नीची नावे असून त्यांनी त्यांच्या राहत्या घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दहा तारखेला मुलगा…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारकर्जत / जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांच्या वतीने जामखेड तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा पत्रकार दिनानिमीत्ताने राहुन गेलेला सन्मान सोहळा सन्मान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.६ जानेवारी हा बाळशास्त्री जाभेकरांचा जन्मदिन पत्रकार दिन संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये साजरा केला जातो मात्र आचारसंहिता व काही तांत्रीक अडचणी त्या दिवशी पत्रकारांचा सन्मान करणे राहून गेल्याने कर्जत जामखेड या मतदार संघाचे विद्यमान आमदार रोहीत पवार यांच्या वतीने ९ फेबुवारी रोजी दुपारी २.०० वाजता जामखेड येथील केशर मंगल कार्यालय येथे दर्पणकार बाळशास्त्री जाभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएसन बोर्ड च्या…
जामखेड। धनराज पवार जामखेड शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यान्वित, युवासेना तालुका प्रमुख सुमित वराट तसेच जामखेड शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे नागेश झाडबुके,योगेश यादव यांची कामगिरी कौतुकास्पद असे उद् गार मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाचे कक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्र्याचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी काढले.काल जामखेड तालुक्यातील जवळा या गावी दौऱ्या प्रसंगी आले होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘गोरगरीबांचे मुख्यमंत्री’ मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्यासाठी वरदान ठरत आहे. गोरगरीबांची सेवा करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे आरोग्यदूत आहेत, असे गौरवोद्वार जामखेड युवसेना तालुकाप्रमुख सुमित वराट यांनी काढले.या मदत कक्षा मार्फत फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया…
महालोकवाणी न्यूज बुलडाणा प्रतिनिधी: 11 फेब्रुवारी 23 : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी चे नेते रवीकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला होता. मागील दोन दिवसांपासून तुपकर हे भूमिगत झाले होते. आज अचानक पोलीस वेशभूषेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले आणि अंगावर रॉकेल ओतून घेतलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज…
१८ व १९ फेब्रुवारी रोजी राहुल उद्योग समूह आयोजित भव्य राज्य स्तरीय नृत्य स्पर्धा जामखेड (प्रतिनिधी): धनराज पवारसालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल उद्योग समूह व महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने स्थानिक कलाकारांसह राज्यातील नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि १८ ते १९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले. असून राज्यस्तरीय वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मनसे नेते पै.दादासाहेब (हवा) सरनोबत व तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे यांनी दिली. जामखेड शहरातील जामखेड सेंट्रल पंचायत समिती समोर असलेल्या प्रागंणात दि १८ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक लहान गट नृत्य स्पर्धा व वैयक्तिक मोठा…