Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सत्य व वास्तवादी लिखाण करुन पत्रकारांनी समाजहिताचे काम करावे – आमदार रोहित पवार

सत्य व वास्तवादी लिखाण करुन पत्रकारांनी समाजहिताचे काम करावे – आमदार रोहित पवार

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 11, 2023Updated:February 11, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
कर्जत / जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांच्या वतीने जामखेड तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा पत्रकार दिनानिमीत्ताने राहुन गेलेला सन्मान सोहळा सन्मान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.
६ जानेवारी हा बाळशास्त्री जाभेकरांचा जन्मदिन पत्रकार दिन संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये साजरा केला जातो मात्र आचारसंहिता व काही तांत्रीक अडचणी त्या दिवशी पत्रकारांचा सन्मान करणे राहून गेल्याने कर्जत जामखेड या मतदार संघाचे विद्यमान आमदार रोहीत पवार यांच्या वतीने ९ फेबुवारी रोजी दुपारी २.०० वाजता जामखेड येथील केशर मंगल कार्यालय येथे दर्पणकार बाळशास्त्री जाभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएसन बोर्ड च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण यांची कन्या कु. स्विटी नासीर पठाण तसेच पत्रकार बांधवाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचा भेटवस्तु देवून सन्मान करण्यात आला.


यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , मुंबई शाखा जामखेड तालुका अध्यक्ष दिपक देवमाने, शहराध्यक्ष फायक अली सय्यद, जामखेड तालुका मिडिया क्लब चे अध्यक्ष सुदाम वराट , खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात ,दत्तात्रय राऊत आदी मान्यवर तसेच तालुक्यातील अनेक पत्रकार बंधु आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार , संतोष थोरात ,दिपक देवमाने , फायक अली सय्यद,बाळासाहेब शिंदे , दत्तात्रय राऊत , कु.स्विटी नासीर पठाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले,सत्य व वास्तवादी लिखाण करुन पत्रकारांनी समाजहिताचे काम करावे तसेच सत्ता येत असते जात असते परंतु मी केलेल्या कामाची बातमी आपण छापा किंवा नका छापू,सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न बातमी मध्ये छापावे तसेच सत्ता आली म्हणून विरोधकांनी सुद्धा सर्व सामान्य जनतेच्या मुलभुत प्रश्नांचा विचार केला पाहीजे पंरतु चांगल काम करणाऱ्या आधिकाऱ्याला निलंबीत करुन सत्तेचा दुरुपयोग दाखवणे हे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला ते अधिकारी व त्यांचे वरिष्ठ सहकारी नक्कीच विचार करतील असे नाव न घेता आमदार रोहीत पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर टिका केली.

जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वास्तववादी लेखणीनेच मला व जनतेने स्वीकारले आहे, मी फक्त काम करतो विरोधकांच्या टिकेचा कधीच विचार करीत नाही, तसेच पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्यच आहे असे उद्गार आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथे व्यक्त केले.
पुढे बोलताना पवार म्हणाले ,मी गेली तीन वर्षापासून माझी आई पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने सन्मान करीतच आहे, परंतु या वेळी काही अडचणीमुळे हा कार्यक्रम घेण्यास उशीर झाला परंतु पुढील काळात मी पत्रकार दिनाच्या दिवशीच आपला माझ्या कुटुंबासहित सर्व पत्रकारांचा सन्मान करील असे यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले,पुढील काळात पत्रकारांच्या सर्व अडचणी समजुन घेऊन मी पत्रकारांना जिथे अडचण असेल तिथे सहकार्य करीन.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर मोरे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य दूत अंकात जामखेड च्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रकाशन
Next Article Daund|दौंड हादरलं..राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळले..!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.