कोल्हापूर: जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विद्यालंकार शेळेवाडी या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना येथे घडली असून या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनी सोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. व्ही पी बांगडी असे या शिक्षकाचे नाव आहे. संबंधित मुलींनी आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित शिक्षकाची सातारा जिल्ह्यात बदली करत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिक्षण संस्थेकडून करण्यात आला आहे. भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिंकला; १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडला धूळ चारून रचला इतिहास !…
Author: mahalokwani
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे दौंड ता.30 जाने 23 लवकरच महाराष्ट्राला दोन राज्यांतर्गत वंदे भारत गाड्या मिळणार आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते शिर्डी रेल्वे मार्गावर धावतील देशाचे कर्तबगार पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण होणार आहे, यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनची नियमित सेवा सुरू झाल्यानंतर या ट्रेनला दौंड स्थानकात थांबा दयावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.श्री. रावसाहेबजी दानवे पाटील साहेब यांचेकडे पत्राद्वारे आमदार राहुल कुल यांनी केली आहे. दौंड जंक्शन हे मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. पुण्याहून…
IND vs NZ, 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताने न्यूझीलंडला ९९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांचीही कोंडी झाली होती. न्यूझीलंडने १०० धावांच्या लक्ष्यासाठी भारताला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले होते. भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावगतीवर वेसण घातले. युझवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. युझवेंद्र चहलने आज भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ९१ विकेट्स घेत भुवनेश्वर कुमारचा ( ९०) विक्रम मोडला. भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिंकला; १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडला धूळ चारून रचला इतिहास ! युझवेंद्र, कुलदीप…
भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अन् नंतर फलंदाजीत कमाल करून दाखवली. इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळून भारतीय मुलींनी जेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतलीच होती. त्यानंतर फलंदाजांनी त्यांची भूमिका पार पाडली. श्वेताने या स्पर्धेत सर्वाधिक २९७ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शेफालीनेही ७ सामन्यांत १७२ धावा केल्या. गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने भारताकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या आहेत. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात चमकदार खेळ करताना भारताच्या पोरींनी इंग्लंडची…
रायपूर: आधी आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर बाबा आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर बाबांनी नव्या वादाला फोडणी दिल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्य मंत्र्यावर अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने झाडल्या गोळ्या; प्रकृती चिंताजनक बागेश्वर बाबा काय म्हणाले? “संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज…
महालोकवाणी न्यूज अहमदनगर ता.29 ,जाने 23 अहमदनगर प्रतिनिधी:- विजय मते नगर – प्रत्येक व्यक्तीने आपले आचार व विचार, कुळाचार याचे धर्मास अनुसरुन आचरण करतांना समाजाच्या सामुदायिक पद्धती पुन्हा प्रस्थापित करणे, आपल्या हिंदू धर्माची परंपरा टिकवण्यासाठी आपला धर्म, संस्कृती जीवनपद्धती टिकविणे हे कर्तव्य समजावे, असे आवाहन कोल्हापूर येथील करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी केले. पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; हजारो पेन्शनधारकांवर टांगती तलवार, वाचा नेमकं प्रकरण काय ? सावेडी उपनगरात शिलाविहार येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मंदिरात जयंतीनिमित्त सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा सोहळ्यास जगद्गुरू शंकराचार्य यांनी उपस्थित राहून उपदेश केला. यावेळी भागवत कथा मंदार महाराज रामदासी, हभप सुंदरदास रिंगणे, हभप…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे स्व. गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त फिरंगाई शालेय महाविद्यालय कुरकुंभ येथे मुलींना शालेय उपयोगी वस्तु भेट दिल्या. हे सर्व साहित्य अभिजित शितोळे , राहुल भोसले , रफीक भाई शेख , सनी सोनार , संदीप भागवत , रशीद भैय्या शेख , उमेश सोनवणे , .अक्षय साळुंके , यश शितोळे , जमीर शेख , सुरज साळुंके , मुस्तफा शेख , नाना गिरमे , साई गरूड, ऋषी डहाळे, अविनाश कांबळे .यांनी वाटप केल्या या कामाचे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे .शाळेचे प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. आरोग्यमंत्र्यांवर अज्ञात हल्लेखोऱ्यांचा गोळीबार..! मराठी…
जामखेड : जामखेड तालुक्यातील मौजे पाडळी या ठिकाणी सलग सातव्या वर्षी अखंड हरिनाम नामजप सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. ह.भ.प. कैलास (काका) भोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाडळी येथे “राम कृष्ण हरी” या जपाचा सात दिवस नामजप सप्ताह आयोजित केला जातो. यावर्षीही मोठ्या उत्साहामध्ये या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याचा काल सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाहरुख खानने पठाण चित्रपटाचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला; वाचा #AskSRK च्या माध्यमातून किंग खान काय म्हणाला.. या सोहळ्यामध्ये काल सकाळी गावातून पताका टाळ मृदुंग अशी पारंपारिक दिंडी काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प.कैलास महाराज भोरे यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सप्ताहासाठी…
महालोकवाणी न्यूज:- दि.29 जाने 2023 ओडिशामध्ये आज (रविवारी) आरोग्यमंत्र्यांवर अज्ञात हल्लेखोऱ्यांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहेत. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ननब किशोर दास असे या आरोग्यमंत्र्यांचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांच्या हातातून निसटलेला आरोपी 12 तासात जेलबंद…! नब दास हे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारात ब्रजराजनगर येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. काही संशयितांनी अचानक त्याच्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. हल्लेखोर हे पोलिसांच्या वेशात होते. नब दास यांच्या छातीत ४ ते ५ गोळ्या लागल्याचे…
महालोकवाणी न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:- दौंड. ता. 29 जाने 2023 लोणारवाडी तालुका दौंड येथे विविध विकास कामांच्या प्रसंगी ते बोलत होते.. ते पुढे म्हणाले की मुंजाबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या इमारती सह ऐकुण 35 लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटनआमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते पार पडले. तालुक्यात जल जिवन योजनेची . कोट्यावधी रूपयांचे कामे चालू आहेत तसेच तालुक्यातील सर्व जल जिवन योजनेला भीमा नदीचे दूषित पाणी पिण्यायोग्य नसल्याने ते वापरता येणार नाही म्हणून कॅनॉलच्या पाण्याचा वापर करण्याचा आमचा माणस आहे. तसेच .तालुक्यात विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून तालुक्याचा सर्वांगीण विकास…