Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गुरू शिष्याच्या नात्याला कलंक; शिक्षकाकडून मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत गैरकृत्य..

गुरू शिष्याच्या नात्याला कलंक; शिक्षकाकडून मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत गैरकृत्य..

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Porn.
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कोल्हापूर: जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विद्यालंकार शेळेवाडी या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना येथे घडली असून या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनी सोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. व्ही पी बांगडी असे या शिक्षकाचे नाव आहे. संबंधित मुलींनी आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित शिक्षकाची सातारा जिल्ह्यात बदली करत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिक्षण संस्थेकडून करण्यात आला आहे.

भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिंकला; १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडला धूळ चारून रचला इतिहास !

शिक्षक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देत त्यांना मोठे करायचे काम घडवत असतात. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य घडत असते मात्र असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाने नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत मुलींसोबत गैर कृत्य केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू असून याबाबत संबंधित पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतप्त झालेले पालकानी शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षकाने पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकार करू लागला.

यामुळे मुख्याध्यापकांनी तातडीने येथील गावच्या पोलीस पाटलांना बोलवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र यावेळी संबंधित शिक्षक हा शाळेत आलाच नाही. यामुळे गावकऱ्यांनी त्याची उचलबांगडी करण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधित शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी देत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरी संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारायची, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्त्यव्य !

संबंधित शिक्षक हा शाळेतील नववी दहावीत शिकणाऱ्या वीस ते पंचवीस मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांच्या खांद्यावर हात टाकणं,खिशात हात घालत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली होती. आलेल्या तक्रारीनुसार त्वरित मुख्याध्यापकांना सदर शिक्षकाचे बदली करण्याचे आदेश दिले असून यापुढे संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करू, असे शेळेवाडीचे पोलीस पाटील श्रीपती पाटील यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर रेल्वे गाडिला दौंड येथे थांबा दयावा – आमदार राहुल कुल यांची मागणी
Next Article लिंगायत समाजाचा ‘या’ मागण्यांसाठी महामोर्चा; आझाद मैदानात उसळला जनसागर !
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.