संपादक :-सचिन कांबळे:- 9604737188 महालोकवाणी न्यूज:-दिनांक 24 जाने 2023 नेप्ती, अहमदनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांची करिअर लॅबस बेंगलोर आयोजित कॅम्पस ड्राईव्ह मध्ये निवड झाली असून त्या माध्यमातून तीन ते साडेसात लाखांचे भर भक्कम वार्षिक पॅकेज उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये अंतिम वर्ष अभियांत्रिकी मध्ये शिकणाऱ्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू असतानाच बेंगलुरु येथील कंपनीत निवड झाली आहे त्यामुळे छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे … बेंगलोर येथील करिअर लॅम्प्स या कंपनीतर्फे श्री सलमान जिया , कंपनी सेक्रेटरी , मनोज पडघन श्री अतुल सागर…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज :- धनुष्यबाण चिन्हावर अधिकार कुणाचा असणार या मुद्दावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. पण, आता धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय आज 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 30 जानेवारीला दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नाही. 30 जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार आहे. ठाकरे गट कोणतही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागले आहे. 16 जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती. शिंदे गटाने दाखल केली कागदपत्र ही जुनी आहे, महेश…
पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सौ.कांचनताई राहुलदादा कुल यांची प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा प्रतिनिधी:बबनराव धायतोंडे कैलास विद्या मंदिर विद्यालयात आज महिला पालकांसाठी “एक दिवस आईचा ” या अंतर्गत हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सौ.कांचनताई राहुलदादा कुल उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व सिने अभिनेता श्री सुभाष यादव यांनी सुमारे ५०० उपस्थित महिलांचा पैठणीचा खेळ घेऊन उपस्थितांची मने जिंकली,अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात प्रसन्नपणे आपल्या अनोख्या आणि सदाबहार व्यक्तिमत्वाची छाप त्यांनी प्रेक्षकांवर पाडली,विद्यार्थ्यांनी या नवीन उपक्रमाचा मनमुरादपणे आनंद लुटला, तसेच 1) सौ सुप्रिया निलेश…
कॅनबेरा : क्रिकेट विश्वात दररोज विविध रेकॉर्ड होत असतात. क्रिकेटमध्ये कधी काय होईल, सांगता येत नाही, त्यामुळेच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असंही म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियात बिग बॅश टी 20 क्रिकेट लीग सुरु आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने वादळी खेळी केली. स्मिथने होबार्ट हरिकेंस विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 22 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. मात्र या अर्धशतकादरम्यान स्मिथने चमत्कार केला. स्मिथने एका बॉलमध्ये तब्बल 16 धावा केल्या. स्मिथने या सामन्यात एकूण 33 बॉलमध्ये 66 धावा केल्या. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा राॅयल पध्दतीने पार पडला; पहा लग्नातील काही खास क्षण… 1 बॉल 16 रन्सस्मिथने सामन्यातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये हा कारनामा केला.…
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांनी आज लग्नगाठ बांधलीये. गेल्या काही दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल हे एकमेकांना डेट करत होते. इतकेच नाहीतर केएल राहुल याच्या मॅचसाठी अथिया शेट्टी आणि सुनिल शेट्टी कायमच हजेरी लावायचे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्या लग्नाची (Wedding) आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आज खंडाळ्यामध्ये यांनी सात फेरे घेतले आहेत. अत्यंत राॅयल पध्दतीने अथिया आणि केएल राहुल यांचा लग्नसोहळा पार पडलाय. रिपोर्टनुसार दुपारी तीन वाजता यांचे लग्न पार पडले. या विवाह सोहळ्याला बाॅलिवूडच्या अनेक स्टारर्स हजेरी लावली होती. विराट कोहली याच्यापासून…
महालोकवाणी न्यूज:- उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली. आज दिनांक २३/१/२०२३ दुपारी या दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढं राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढं जाऊ. शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण, प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे, असं त्यांनी सांगितलं. दोघांच्या संयुक्त निवेदनात:- आपल्या देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडं जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडं…
संपादक:- सचिन कांबळे -9604737188 महालोकवाणी न्यूज:- बोल्हेगाव मधील द्वारका नगरी ही वसाहत नव्याने तयार झालेलि आहे. या द्वारका नगरी अंतर्गत फेज 2 पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकलेलि नव्हती . येथील सर्व महिला दुर अंतरावरून पिण्याचे पाणि आणत होत्या. यामुळे येथील सर्व नागरीक अत्यंत त्रस्त झालेले होते. त्यांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या बाबत द्वारका नगरी मधील सर्व नागरीकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांना कळवले ,पिण्याच्या पाण्याची महत्वाची समस्या असल्याने पाणीपुरवठा विभाग मनपा यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून,नागरीकांच्या सहकार्यातुन द्वारका नगरी अंतर्गत फेज 2 पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकुन द्वारका नगरी मधील नागरीकांची कायमची समस्या सोडवलि.…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:- महालोकवाणी न्यूज:- दौंड तालुक्यातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत गेल्या पाच दिवसात टप्प्या-टप्प्याने चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अद्याप या चार मृतदेहाची ओळख पटलेली नाही, तसेच या भागात वाळूचे अनेक अड्डे आहेत, याबाबत ही यवत पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे या परिसरात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहे मध्यम वयीन महिला आणि पुरुषांचे मृतदेह असून नेमका घातपात झाला आहे की आत्महत्या केली याबाबत खात्री पटली नाही, या परिसरात हे मृतदेह एकाच कुटुंबातील आहेत की वेगवेगळ्या कुटुंबातील आहे…
महालोकवाणी न्यूज:- भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकत्याच विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आले आहेत, अहमदनगर जिल्ह्याच्या प्रदेश प्रवक्ता पैनलिस्ट पदी मा नितीन दिनकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास पाहता भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याचे पाहायला मिळत आहे . दिनकर यांचे काम अतिशय उत्कृष्ट असून एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून पक्ष संघटना मजबूती करणांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, तसेच विविध आंदोलने यांच्यामार्फत दिनकर यांनी स्वतःचे काम सिद्ध केले आहे , तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे अतिशय विश्वासू म्हणून नितीन दिनकर यांची ओळख आहे, याच निमित्ताने आज अहमदनगर येथे त्यांची निवड…
महा लोकवाणी न्यूज मुंबई दि. 20 – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे एक दिवसीय अभ्यास शिबीर येत्या मंगळवार दि.24 जानेवारी रोजी महाबळेश्वर येथील ब्ल्यू पार्क हॉटेल येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्ष व्यापक आणि मजबूत करण्यासाठी ; रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन राजकीयदृष्ट्या पक्ष संघटन व्यापक करण्यासाठी या अभ्यास शिबिरात विचारमंथन करण्यात येणार आहे. रिपाइं च्या या एक दिवसीय अभ्यास शिबिरात दलित आदिवासी अल्पसंख्यांक मागासवर्गीय सर्व समाज घटकांच्या विषयावर चर्चा होणार आहे. रिपाइं च्या एक दिवसीय अभ्यास शिबिरात डॉ.शरण कुमार लिंबाळे ; डॉ.अच्युत…