महालोकवाणी न्यूज:- औरंगाबाद औरंगाबाद शहर पोलीस दलातील (Aurangabad City Police) सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP – Assistant Commissioner of विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आज त्यांना अटक करुन, न्यायालयात हजर केले असता, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीचा ढुमे यांनी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सिटी चौक पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली होती. दरम्यान आज सकाळी त्यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज:- नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पाडली. या स्पर्धेत सर्वच कुस्त्या जोरदार झाल्या. पण, या स्पर्धेत सेमिफानल कुस्तीवरुन नवा वाद सुरू झाला. नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पाडली. या स्पर्धेत सर्वच कुस्त्या जोरदार झाल्या. पण, या स्पर्धेत सेमिफानल कुस्तीमधून नवा वाद सुरू झाला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड असा सामना झाला. या सामन्यात सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप सोशल मीडियावर सुरू आहे. या सामन्यावरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका गटाने सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या गटाने अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे. यावरुन आता सोशल मीडियावर चांगलाच…
महालोकवाणी न्यूज:- नगर – आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करुनच अभ्यास केला पाहिजे. घरातून आईने केलेले संस्कार, शाळेतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी जे ज्ञान दिले आहे ते विद्यार्थ्यांना आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन राधाबाई काळे महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य किसन पायमोडे यांनी केले. पंचांनी स्वत:च्या मुलाची शपथ घेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का ? वसंत टेकडी येथील श्रीनाथ विद्या मंदिरचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन समारंभात प्रमुख अतिथी श्री.पायमोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त निर्मलचंद्र थोरात होते. व्यासपीठावर संस्थेचे साई पाउलबुधे, विश्वस्त आर.ए.देशमुख, रामभाऊ बुचकुल, दादासाहेब भोईटे, रघुनाथ कारमपुरी, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा…
महालोकवाणी न्यूज:- 16 जानेवारी 2023 :- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवरून महाविकासआघाडीमध्ये खडाखडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी झालेल्या गोंधळावरून आणि शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे. तसंच यापुढे असं होणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. या कारणामुळे नाराजी.. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवरून महाविकासआघाडीमध्ये खडाखडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी झालेल्या गोंधळावरून आणि शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे. या निवडणुकांसाठी अमरावती आणि नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार, कोकणात शेतकरी कामगार पक्ष, नागपुरात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीला तिकीट देण्याचं महाविकासआघाडीचं ठरलं. यातल्या नागपूरच्या जागेसाठी…
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- बबनराव धायतोंडे महालोकवाणी न्यूज:- डिकसळ ता.इंदापुर येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ अपात्र करण्याची मागणी या संस्थेचे सभासद माजी.व्हाईस चेअरमन सोमनाथ चंद्रकांत भादेकर यांनी केली आहे.याबाबत सोमनाथ भादेकर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इंदापूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ( ग्रामीण) येथे रितसर तक्रार केली आहे. भादेकर यांच्या तक्रारी अर्जात मौजे डिकसळ तालुका. इंदापूर येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सन २०२१ -२२ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नसून रितसर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत आपण संस्थेच्या पंचकमिटीला वारंवार तोंडी मागणी करत असताना देखील पंचकमिटीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही. संस्थेचे सभासद…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय खेड तालुका कर्जत व इंडसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खानवटे तालुका दौंड येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 15 ते 21 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न होत आहे.माननीय डॉ.वैशाली अजोतीकर आणि प्रा. अतिश नाईकवाडे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल गदादे ,प्रा संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 100 (शंभर) स्वंयसेवकांसह श्रीराम विकास सोसायटीचे चेअरमन विलास पवार. तंटामुक्ती अध्यक्ष दिपक ढवळे. खानवटे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव झोंड. ग्रामपंचायत .वैभव लोखंडे . सदस्य अर्जुनराव गायकवाड.आण्णासाहेब लोखंडे. ग्रामसेवक कांबळे . ईत्यादी.पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे आयोजित शिबीर राबविले…
पुणे:- महालोकवाणी न्यूज शनिवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आणि सोशल मीडियावर सिकंदर नावाचे वादळ घोगवले. उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या सिकंदरवर पंचांकडून अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागली. तर, हार कर जितनेवाले को सिकंदर कहत है… अशा पोस्टही व्हायरल झाल्या. त्यामुळे, पंचांच्या निर्णयावर कुस्तीविश्वात आणि सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उभा होत आहे. आता, पै.सिकंदर शेख याचे वडिल रशीद शेख यांनीही पंचांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच, एखाद्या गरिबावर असा अन्याय होऊ नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना…
महालोकवाणी न्यूज:-दि 15 जाने 2023 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नाराज आहेत. त्यांनी फडवणीस यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाजपमधल्या नाराजीची पुन्हा चर्चा होत आहे. निमित्त आहे ते बीडमधल्या गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र पंकजा आणि खासदार प्रीतम मुडे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. या दोघी कार्यक्रमाला येणार नसल्याची माहिती मिळत आहे. संत वामनभाऊ यांचा 47 वा पुण्यतिथी सोहळा आहे. त्यानिमित्ताने गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी राज्यातून लाखो भक्त येतात. याचनिमित्याने गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
महा लोकवाणी न्यूज आज आम्ही तुम्हाला भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी नक्की कोणत्या टेस्ट पार कराव्या लागतात याबद्दल महिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. भारतीय सेना म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते सीमेवर देशाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी सज्ज असलेले जवान. हे जवान ऊन, पाऊस, थंडी आणि प्रचंड बर्फ या सर्वांची चिंता न करता दिवसरात्र देशसेवेसाठी झटत असतात. लहानपणापासून म्हणूनच आपल्यालाही असं वाटत असतं कि आपणही सैन्यात जावं आणि शत्रूशी दोन हात करावेत. मात्र हे स्वप्नं पूर्ण करणं इतकं सोपी नाही. यासाठी प्रचंड मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी निरनिराळ्या चाचण्यांना सामोरं जावं लागतं. मात्र हे…
करमाळा तालुक्यातील डिकसळ ते कोंडा चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडल्याची बातमी महालोकांनी न्यूजने प्रसिद्ध केली होती महालोकांनी न्यूज:- दिनांक 14 जानेवारी 2023 प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे करमाळा तालुक्यातील डिकसळ ते कोंढार चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाडः मोठा अनर्थ होऊ शकतो..? रोजी करमाळा तालुक्यातील कोंडा चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडल्याची बातमी महालोकांनी न्यूजने प्रसिद्ध केली यामागेही कारण अतिशय मोलाचे होते, कारण डिकसळ तालुका इंदापूर ते कोंडा चिंचोली तालुका करमाळा येथील येथील 30 ते 40 गावांना जोडणारा हा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलावरून सर्रासपणे उसाची वाहतूक जड वाहतूक केली जात होती, त्याचे आयुष्यमान संपलेले आहे, तरीसुद्धा जीवघेणी वाहतूक या पुलावरून…