युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने शुक्रवारी युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला केला असून 70 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहे , रशियाने युक्रेनला आपत्कालीन ब्लॅकआउट लागू करण्यास भाग पाडले, मध्य क्रिवी रिहमध्ये अपार्टमेंटला ब्लॉकला मिसाईल धडकल्याने तीन लोक ठार झाले आहे . दक्षिणेकडील खेरसनमध्ये गोळीबारात आणखी एकाचा मृत्यू झाला असे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले. व्यापलेल्या पूर्व युक्रेनमधील रशियन-स्थापित अधिकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेनियन गोळीबारात 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की रशियाकडे अजूनही अनेक मोठ्या हल्ल्यांसाठी पुरेशी क्षेपणास्त्रे आहे. त्यांनी पुन्हा कीवला अधिक आणि चांगल्या प्रकारचे हवाई संरक्षण प्रणाली पाश्चात्य मित्र राष्ट्रांना पुरवठा करण्याचे आवाहन केले.
Author: mahalokwani
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे. ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने तिला समन्स बजावले आहे. ईडीने रकुलला 19 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने टॉलिवूडमधील अनेक कलाकारांची चौकशी केली आहे. सप्टेंबरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी रकुलची चौकशी केली होती. हे प्रकरण 40 वर्षे जुने ड्रग्सशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक कलाकारांनाही समन्स बजावण्यात आले होते. ईडीने या प्रकरणाची चौकशी केली केल्यानंतर त्यांना मनी लाँड्रिंगचा संशय आला. त्यांनी या संदर्भात तपास सुरू केला असून रकुल प्रीत तसेच चार्मे कौर, पुरी जगन्नाथ, तेजा, मुमैथ खान आणि राणा दग्गुबती यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलण्यात आले आहे.…
महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन. महामोर्चाला दोन लाख लोक येणार असल्याचं महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात येतंय. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आज सकाळी 9 वाजता महामोर्चाला सुरुवात होणार आहे. भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनी समोर मोर्चेकरी जमतील. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर या मोर्चाची सांगता होईल. मविआच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपे माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे.…
सिडनी: क्रिकेटच्या खेळात अनेकदा एखाद्या टीमचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. पण बिग बॅश लीगमध्ये तर हद्दच झाली. बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी एडिलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरच्या टीमला फक्त 15 रन्समध्ये ऑलआऊट केलं. सिडनी थंडरची टीम फक्त 35 चेंडूत ऑलआऊट झाली. सिडनीच्या टीममध्ये एलेक्स हेल्स, रिली रुसोसारखे मोठे खेळाडू होते. पण तरीही टीमने सरेंडर केलं. बिग बॅश लीगच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2015 मध्ये मेलबर्न रेनीगेड्सची टीम 57 रन्सवर ऑलआऊट झाली होती. पुरुष क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कुठला संघ 20 रन्सपेक्षा पण कमी धावसंख्येत ऑलआऊट झालाय. सिडनी थंडरची 15 ही धावसंख्या टी 20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी टर्कीच्या नावावर…
गावांत गुरे चोरीच्या गुन्हयांत वाद झाल्याने एम. राज कुमार सो., पोलीस अधीक्षक मोव, चंद्रकांत गो, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी किसन जनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना त्याप्रमाणे सूचना व मार्गदर्शन केले होते. नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे तपास पथक तयार करून अज्ञात गुर चोरी करणारीची माहीती काढणे बाबत सुचना दिल्या होत्या. दिनांक दि.१५/१२/२०२२ रोजी किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव मार्फत बातमी मिळाली की, पाळधी ता. धरणगाव येथील मोहंमद फयाज मोहमंद अयाज हा गुन्हे चोरीचा मुख्य आरोपी असुन तो जळगाव शहरात अंजिठा चौफुली परिसरात त्याची महेंद्र स्कॉपियो चारचाको वाहन क्र. MH…
आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल आहे. घराबाहेर पडतांना सर्वात आधी आपण मोबाइल सोबत घेतला आहे की नाही याची खात्री करून घेतो. म्हणजे मोबाइल आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झालाय. मात्र, सिमकार्ड शिवाय, मोबाईल म्हणजे, प्राणाविना देह.कितीही भारीचा फोन असला अन् त्यात सिमकार्ड नसेल तर त्या फोनचा काही उपयोग नाही. त्यामुळं मोबाइलमधील सिमकार्ड देखील खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय मोबाइल निरुपयोगी ठरतो. मात्र, हेच सिमकार्ड एका कोपऱ्यात का कापलेला असते यांचा कधी विचार तुम्ही केलाय का? याच विषयी जाणून घेऊ. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र, फोन वापरण्यासाठी दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे, ते म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि सिम कार्ड. सिम…
अभिनेता रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी जेनिलिया देशमुख पहिल्यांदाचं एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2012 मध्ये रितेश आणि जेनिलिया यांनी लग्न केलं. त्यानंतर जवळपास 10 वर्षांनी दोघेही पहिल्यांदा एकत्र मराठी सिनेमात दिसणार आहेत. रितेश आणि जेनिलिया यांच्या वेड या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान आता हा सिनेमा ओरिजिनल नसून साऊथ सिनेमाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं या चर्चांमागचं कारण काय ? वेड टीझरनंतर सिनेमासाठी उत्सुकता चांगलीचं वाढली होती. दरम्यान प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. जेनिलिया, रितेशबरोबरच सिनेमात ज्येष्ठ अभिनेते…