Author: mahalokwani

ता. 24 : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. फलटण येथे हा अपघात झाला असून या अपघातात आमदार गोरे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावरून जाताना आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार सुमारे ३० फूट ऊंच असेलल्या पुलावरून खाली कोसळली. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून खाली कोसळली असल्याचे समजते. गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्या आमदार…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे कोंडीराम सदाशिव क्षीरसागर माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, भिगवण मध्ये ब्युटी पार्लर कोर्स प्रशिक्षण निःशुल्क सुरू करण्यात आले आहे… इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विभागातील सर्व विद्यार्थिनींसाठी हा कोर्स ( प्रशिक्षण ) उपलब्ध करण्यात आला असून या कोर्सच्या माध्यमातून सर्व गरजू व उत्साही असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी याचा फायदा होणार आहे.                  संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अजित क्षीरसागर,  महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय तुषार क्षीरसागर सर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश गायकवाड, ज्यूनियर विभाग प्रमुख प्रा. नवनाथ सावंत यांनी आपल्या मनोगतातून ब्युटी पार्लर कोर्स चे महत्व व आजची काळाची गरज याविषयी विद्यार्थिनींना जागृत केले..                सदर…

Read More

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावात धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला पाठीशी घातल्याचे प्रकरण राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर शेकले आहे. हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक दराडे यांची येत्या पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आणि तोपर्यंत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याच्या सूचना प्रभारी गृहमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत दिल्या. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी याविषयावर अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. एप्रिल २०२२ मध्ये राहुरी तालुक्यातील ही घटना उघडकीस आली होती. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात आठ महिन्यापूर्वी पंजाब मधील कमलसिंग नावाच्या ख्रिश्चन मिशनऱ्याने एका भाजीविक्रेत्या महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे.…

Read More

चीन आणि इतर अनेक देशांमध्ये कोविड-१९ च्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीये. चीनमध्ये या व्हेरियंटने मोठा हाहाकार निर्माण केला. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी प्रेतांच्या रांगा लागल्या. भारतात देखील कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट बीएफ.७ व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळले. त्यामुळं केंद्र सरकारने इंट्रानेजल व्हॅक्सिनला म्हणजेच नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी परवानगी दिलीये. दरम्यान, नाकावाटे दिली जाणारी लस कशी काम करते? आणि ती कुठे मिळणार? याच विषयी जाणून घेऊ. दोन वर्षांनी कोरोनातून नुकताचं कुठं सुटकेचा श्वास मिळाला असतांना आता काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंड हातपाय पसरू लागला. भारतातही कोरोनाच्या सर्वात जास्त धोकादायक असलेल्या व्हेरियंट BF.7 चे रुग्ण आढळले. BF.7 चे व्हर्जन सर्वात आधी चीनमध्ये…

Read More

महालोकवाणी न्यूज:- अंमळनेर :दि. 23 अंमळनेर ग्रामपंचायत ची नुकतीच निवडणूक पार पडली .जनतेने कौल दिला आहे . तो सर्वानी स्वीकारला पाहिजे . नवीन सरपंचांनी पद स्वीकारण्या पूर्वी गेल्या पंच वार्षिक चा संपूर्ण हिशोब घ्यावा व गावातील चौकात हिशोबाचे फ्लेक्स लावावेत अशी मागणी प्रा.बाळासाहेब पवार यांनी केली आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी बिनविरोध चा घाट घातला गेला परंतु तो उधळून लावण्यात आला . सत्ताधारी पॅनल ने त्यांच्या दरबारात सर्व ठरवले होते . परंतु गावाकऱ्यांनी एकत्र येत निवडणूक लढवली व अंमळनेर गावात चार जागा जिंकल्या आहेत . मिसळवाडीत प्रचंड दहशत असताना तेथील मतदारांनी दहशती विरुद्ध कौल दिला परंतु अंमळनेर च्या इंदिरा नगर मधून…

Read More

महालोकवाणी न्यूज दिनांक. 23 माऊली संकुल येथे लिटिल फ्लावर स्कूलच्या तीनही शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश लहान मुले यांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून समाजाला देण्याचा प्रयत्न केला. व त्याचे रक्षण करणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे निसर्गाशी मैत्री करण्याचा संदेश यू.के.जी. च्या मुलांनी एका नाट्यद्वारे सर्वांना दिला . तर वृक्षाची तोड थांबवावी आणि नैसर्गिक ऑक्सिजनची वाढ करावी, हा संदेशही नाटकाद्वारे उपस्थित यांना देण्यात आला. पशु ,पक्षी , पाणी , पर्वत , चंद्र सूर्य , तारे , धरती , आकाश या सर्व नैसर्गिक संपत्तीचे नृत्याच्या माध्यमातून पालक वर्गाना सांगण्याचा प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात केला…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी:- बबनराव धायतोंडे अदाणी इलेक्ट्रिकल या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपनीला समांतर नवीन लायसंसी स्थापित कुरुन गडगंज १००० कोटी रूपया पेक्षा जास्त महसुल मिळवणारा प्रदेश उदा: नवी मुम्बई,पनवेल,उरण, ठाणे,मुलुंड,भांडूप,तळोजा क्षेत्रातील हे असा ५ लाख वीजग्राहकांचे क्षेत्र महावितरण कंपनी ऐवजी अदानी इलेक्ट्रिकल कपंनीला हस्तांतरीत सध्या व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करून असा परवाना मागितला आहे.खाजगी कार्पोरेट घराण्याने पुर्णतः औद्योगिक विकास झालेल्या व भविष्यात होणाऱ्या विभागावर जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने समांतर लायसंकीची मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला. महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी व अत्यंत कार्यक्षम ठरलेली कंपनी असून केंद्र सरकारने कंपनीच्या एकूण…

Read More

मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लावणीमध्ये अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप गौतमी पाटील वर करण्यात येतोय. तसेच महाराष्ट्रभर होत असलेल्या गौतमीच्या लावणी कार्यक्रमात दंगा किंवा चुकीच्या घटना घडत आहे. यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमांवर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विकास सेनेने केली आहे. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथे झालेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात मिरज दत्तात्रय ओमासे या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या व्यक्तीच्या मृत्यूस गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे गौतमी…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर तेजीत आहेत. तर चांदी स्वस्त झाली आहे. सोन्याचे भाव 0.08 टक्क्यांनी वाढले आहे. तर चांदीचे भाव 0.58 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी चांदीचे दर 4 टक्क्यांनी वधारले होते. मात्र पुन्हा चांदीचे दर घरसले आहेत. वायदा बाजारात गुरुवारी 55,079 रुपयांवर सोन्याचे दर पोहोचले होते. बाजार बंद होताना 170 रुपयांनी तेजी पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,820 रुपये मोजावे लागत आहेत. तर 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,482 रुपये मोजावे लागत आहेत. MCX वर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीचा दर आज 13 रुपयांनी कमी होऊन 69,696 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा भाव वाढून 74,960…

Read More

सिल्लोड येथे होणार राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजननिवृत्ती महाराज इंदोरीकर,अजय – अतुल, अभिनेता प्रसाद ओक सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लावणार हजेरी शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानावर सिल्लोड महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याअनुषंगाने येथे व्यासपीठ व मंडप उभारणीच्या कामाला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमीपूजन करून या कामाला सुरुवात करण्यात आले आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून येत्या 1 जानेवारी पासून सिल्लोड येथे ‘ राज्यस्तरीय सिल्लोड महोत्सव 2023 ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सिल्लोड महोत्सव अंतर्गत नगर परिषद प्रशालेच्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार व गायक, अजय…

Read More