काही महिलांनी अर्ज केल्यानंतरही त्यांना Ladki Bahin Hapta अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या महिला नाराज झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नवीन अपडेट दिली आहे. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! Ladki Bahin Hapta | लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. ही योजना जून महिन्याच्या अखेरपासून सुरु झाली. या…
Author: mahalokwani
वयाच्या ६७ व्या वर्षी पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे घेतला अखेरचा श्वास…..! शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी Balamtakli येथील रहिवासी असलेले सध्या व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध उद्योगपती तथा डी.एन.के. ग्रुप आणि नहार ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष अशोकलाल झुंबरलाल नहार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी मंगळवार दि. ५ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. Balamtakli | बालमटाकळी येथील प्रसिद्ध उद्योगपती पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बालमटाकळी सह परिसरात होणाऱ्या धार्मिक, सामाजिक गावच्या सार्वजनिक कार्यात नेहमी त्यांचा सिंहाचा वाटा असायचा मंदिराच्या तसेच इतर सामाजिक…
शहर भाजप महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय नगर – राज्यात तीन पक्षांची महायुती झाल्यावर नगर शहरातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरची ही पहिलीच बैठक आहे. भाजपचे काही ध्येयधोरणे आहेत. त्यानुसारच काम करून निर्णय घेण्यात येतात. त्यानुसार आजपासून महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना शहर भाजपचे अधिकृतरीत्या समर्थन देण्यात येत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत निस्वार्थ, निरपेक्षपणे, सचोटी व प्रामाणिकपणे काम करून उमेदवार आ.जगतापांच्या मागे उभे राहून त्यांच्या विजयासाठी योगदान द्यावे. महायुतीमधील घटक पक्षांना बरोबर घेत कोणत्याही प्रकारचा संभ्रम व किल्विश न ठेवता जासतीत जास्त प्रचार व काम करू, असे प्रतिपादन शहर भाजपचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले. विधानसभा…
विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे, आत्ता नगर शहरात संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर अशी सरळ लढत होणार आहे. आमदार संग्राम जगताप Sangram Jagtap यांनी माघील काही दिवसापासून नगरशहारत अनेक वार्डात विकास यात्रा काढली आहे, याला लोकांनी पसंदी दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संग्राम जगताप यांना आपले तिकीट फायनल आहे हे माहित असल्यामुळे त्यांनी आधी पासूनच प्रचाराला सुरवात केली होती , आत्ता त्यांनी बऱ्यापैकी निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. Sangram Jagtap| आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामावर नगरकर खुश MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का अद्याप विरोधी पक्षाला बंडखोरी रोखण्यात दिवस चालले आहेत , त्यांचा प्रचार कोणत्या मुद्यावर होणार…
जामखेड प्रतिनिधी गेली ३१ वर्षापासून जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रसिद्ध व्यापारी माननीय दिलीप बाफना व बाफना परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येतो. ३० वर्षांपूर्वी हभप बाबा महाराज सातारकर, हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड ते पंढरपूर दिंडी सोहळा सुरू केला होता आजही हा सोहळा सुरू आहे. आज रोजी सकाळी दहा वाजता जामखेड शहरातील बाफना मशिनरी येथून मोठ्या उत्साहात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडी चे श्री क्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान झाले. यावेळी हभप विक्रम बागडे (महाराज), माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठ बाफना, सिताराम राळेभात (महाराज), हभप पंढरीनाथ राजगुरू (महाराज),हभप विवेक मंजरतकर…
जामखेड प्रतिनिधीगौतम कलश निधीचे संकलन समाजातील शिक्षण, आरोग्य, व्यावसायामध्ये मदत करण्यासाठी भव्य योजना परमपूज्य उपाध्याय श्री प्रविण ऋषीजी म.सा. यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे. याचे गावोगावी स्थापना झालेली आहे.आज रोजी दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जामखेड जैन स्थानक येथे परमपूज्य सुनंदाजी म.सा. आदि ठाणा ६ यांच्या पावन सानिध्यामध्ये गौतम निधी फाऊंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप बोगावत व कार्यकारणी यांनी गौतम कलश अनुष्ठान चा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परमपूज्य सुनंदाजी म.सा. बोलताना म्हणाल्या की,गौतम निधी कलश अनुष्ठान व संकलन हा कार्यक्रम समाजातील गरजवंत व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजातील प्रत्येक व्यक्तीने या गौतम कलश निधीमध्ये दररोज परिवारातील प्रत्येक सदस्याने…
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश कर्जत जामखेड ता.३१ – कर्जत जामखेडमधील शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी MLA आमदार राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्याने आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचं बोलले जात आहे. MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का कर्जत जामखेड मतदार संघाची 2024 ची विधानसभेची निवडणूक ही आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामामुळे आणि सर्वसामान्य जनतेची केलेली कामे यामुळे एकतर्फी असल्याचं सर्व सामान्य जनतेचे मत झाले आहे. ही निवडणूक…
बुरुडगावला विकासकामातून शहरीकरणाचे रूप – आमदार संग्राम जगताप नगर : बुरुडगाव हे शहरालगतचे गाव असून गेल्या १० वर्षांमध्ये विकास कामातून कायापालट केला असून त्याला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. बुरुडगाव चा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता हे गाव महापालिका हद्दीबाहेरील असल्यामुळे पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होत होती तरी देखील हा प्रश्न मार्गी लावला असून याच बरोबर सीना नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे नागरिकांचा कायमस्वरूपीचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रस्ते लाईट, पाणी, ड्रेनेज आदी प्रश्न मार्गी लागून सामूहिक प्रयत्नतून बुरुडगावचा चेहरा मोहरा बदलला आहे. शहराचे सर्वांगीण विकास कामे मार्गी लावले असल्यामुळे उपनगराच्या विस्तारीकरणाला गती प्राप्त झाली आहे केलेली…
जामखेड : जामखेड तालुक्यातील देवदैठणमधील सोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांस १०० पेक्षा अधिक प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी सुरु असलेल्या ‘भूमिपुत्रांच्या’ लढ्याला ‘बळ’ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘आपला तो आपलाच’ असे म्हणत या सर्वांनी आमदार प्रा राम शिंदे Ram Shinde यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. दैवदैठणमधील या राजकीय भूकंपामुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय ‘वारे’ रोहित पवारांविरोधात पुर्णता: फिरल्याचे यातून स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपा नेते संजय काका काशिद यांच्या पुढाकारातून व जामखेड बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, महारूद्र महारनवर यांच्या सहकार्यातून देवदैठण येथीलसोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत…
कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत मोठी रंगत येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांचे एक निकटवर्तीय तसेच जामखेडचे मा. नगराध्यक्ष विकास राळेभात विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत, त्यांनी सोमवार दिनांक २८ ऑक्टो २०२४ रोजी आपल्या अनेक मराठा कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विकास राळेभात यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही, येणाऱ्या विधानसभेत चित्र बदलेले पाहायला मिळू शकते, कारण राज्यभरात जरांगे पाटील Manoj Jarange फॅक्टर सध्या जोरात चालत आहे, आणि विकास राळेभात यांचा कर्जत- जामखेड मध्ये मोठा जनसंपर्क आहे, त्यांना मानणारा मोठा युवक वर्ग या दोन्ही तालुक्यात आहे Manoj Jarange | जरांगे पाटलांचा मोठा डाव; कर्जत-जामखेडमध्ये मा. नगराध्यक्ष विकास राळेभात…