जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील प्रसिद्ध छायाचित्रणासाठी लोकप्रिय असलेले छायाचित्रकार सुनिल उर्फ (दादा) कलासागर कासार यांचे समर्थ हाॅस्पिटल येथे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले. लोकसभा निवडणूक छायाचित्रणासाठी गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थवाटू लागले. त्यानंतर, तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आल़े मात्र, उपचारादरम्यानच सुनिल उर्फ दादा (कलासागर) कासार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील असा परिवार आहे. रविवारी दुपारी 1:00 वाजता शहरातील तपनेश्वर येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुनिल हे प्रेमळ व मोठ्या मनाचा माणूस म्हणून तालुक्यात ख्याती असलेले व एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.त्यांच्या निधनाने छायाचित्रण क्षेत्रचे मोठे नुकसान झाल्याची हळहळ दिग्गजांनी व्यक्त केली…
Author: mahalokwani
शरद पवारांवर डॉ. विखेंनी साधला निशाणा नगर । प्रतिनिधी अहिल्यानगरी मधील व्यापाऱ्यासाठी महायुतीच्या सरकारच्या मार्फत विविध सेवा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नेप्टी बाजारपेठेतील मधील कांदा मार्केट मध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापारी हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या लोकसभा मतदार संघात प्रचार सभा, कॉर्नर मिटींग आणि गाठी भेटी देण्यावर भर दिला आहे. याच निमित्ताने ते आज नगर शहरातील कांदा मार्केट मध्ये व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधत होते. यावेळी त्याच्यासोबत आमदार संग्राम जगताप, उद्योगपती सचिन कोतकर, अविनाश घुले, निखील वारे…
लंकेंची मात्र ३५ लाखांनी घटली; विखेंची संपत्ती १२ कोटींनी वाढली नगर : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. डॉ. सुजय विखे व नीेलश लंके यांच्या मालमत्तेमध्ये कमालीचा फरक दिसून येतोय. दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून विखेंची मालमत्ता वाढल्याचे तर नीलेश लंके यांची मालमत्ता घटल्याने नीलेश लंके हे सर्वसामान्यांसाठी स्वतःची पदरमोड करून सेवाभाव करीत असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. सुजय विखे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सुजय व त्यांची पत्नी धनश्री व यांच्याकडे २९ कोटी १८ लाख रूपयांची संपत्ती आहे. गत पाच वर्षात त्यांची संपत्ती १२ कोटी ३२ लाख रूपयांनी वाढली आहे. सुजय यांच्याकडे ५४१…
अहिल्यानगर । प्रतिनिधीअहिल्यानगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अभय आगरकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…
कर्जत । प्रतिनिधी भारताने अमृतकाळात प्रवेश केला असून मोदी पर्वात जगावर आपला ठसा उमटविला आहे. देशात सुरू असलेली मोदी गॅरंटी ही निवळ घोषणा नसून १४० कोटी जनतेच्या विकासाची हमी असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या केवळ १० वर्षाच्या काळात विकसित देशाकडे वाटचाल केली चालू केली आहे. ११ व्या स्थानावर असेललेली अर्थव्यवस्था मोदीजींनी ५ व्या स्थानावर आणली. यामुळे मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनतेच्या विकासाचा मुलंमत्र असल्याचेही खा. सुजय विखे म्हणाले. ते कर्जत येथिल कर्जत तालूक्यातील निमगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे यांच्या सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.…
राष्ट्रवादी (शरद पवार Sharad pawar गट) चे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (शुक्रवार) नगर दौऱ्यावर आहेत. ते दिवसभर नगरमध्ये थांबणार असून ते रात्री येथे सभा देखील घेणार आहेत. दरम्यान आता या दौऱ्याबाबत खा. सुजय विखे यांच्याशी मीडियाने संवाद साधला असता त्यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. Sharad pawar| शरद पवार नगरचा विकास पाहून भारावून जातील सुजय विखे पाटील शरद पवार Sharad pawar साहेबांचे आम्ही नगरमध्ये स्वागत करतो. ते आता पाच वर्षानंतर अहमदनगरमध्ये येतायेत. बहुतेक पाच वर्षात त्यांना त्यांच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळाला नसावा. आता ते पाच वर्षानंतर येतायेत तर त्यांनी नव्याने केलेल्या फ्लायओहर ने यावे. नव्याने झालेल्या बायपास ने यावे, नवीन…
सुजित पाटील झावरे मित्रमंडळ आणि देवकृपा प्रतिष्ठान यांच्यावतीने टाकळी ढोकेश्वर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य सुप्रिया अमोल साळवे यांनी दिली. महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे sujay vikhe पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी दि. २१ एप्रिल रोजी टाकळी ढोकेश्वर बाजार तळ येथे आयोजित करण्यात आला असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे व समाजहिताचे राजकारण यामुळे त्यांना लोकसभेला ताकतीने पाठिंबा द्यायचा निर्णय या आधीच तालुक्याचे नेते सुजित पाटील झावरे यांनी पारनेर येथील कार्यकर्ता मेळाव्यात घेतलेला आहे. त्यामुळे खासदार सुजय विखे पाटील यांना…
sujay vikhe | खा. डॉ. सुजय विखे सरकारच्या योजनांची गॅरेंटी देशातील जनतेला आली आहे. देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्विकारले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार असून अहिल्यानगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक विजयात राहील असा विश्वास अहिल्यानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती कडून सुरू असलेल्या प्रचाराची माहीती जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. भालसिंग म्हणाले की, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाच्या केंद्रस्थानी पोहचविले आहे. मोदींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात भारत आर्थिक महासत्ता म्हणुन उदयास येईल यात कोणतीही शंका नाही. मोदी सरकारच्या…
शिवसेना, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, आप सह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जनसावंद यात्रेस सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा अन मोटारसायकल रॅलीला नगर शहरात बुधवारी (दि.१७) प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप सह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने निलेश लंके यांनी नगर शहरात मोठे शक्ती[प्रदर्शन केल्याचे दिसून आले. तसेच अनेक एक्झिट पोल सर्वेनुसार लोकांची निलेश लंके यांना पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, काल अनेक टीव्ही चॅनेलनी एक्झिट पोल दाखविले त्यात निलेश लंके हे विजयी होणार असे पोल दाखविण्यात आले आहे,…
गेली पन्नास वर्षे विखे परिवाराने संपूर्ण नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले. पारनेरसह नगर, पाथर्डी तालुक्यात कुकडी प्रकल्पाचे पाणी भुईदंडाने आणू अशा वल्गना खा.सुजय विखे यांचे आजोबा माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी चाळीस वर्षे केल्या.मात्र ते साध्या नळानेही पाणी आणू शकले नाहीत.अशी घणाघाती टीका आमदार नीलेश लंके Nilesh lanke यांनी केली. टाकळी ढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. टाकळीढोकेश्वरच्या सरपंच अरूणा खिलारी अध्यक्षस्थानी होत्या. आ. लंके म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आपल्या मतदारसंघाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला.आजही सुमारे साडेतिनशे कोटी रूपयांचा निधी रोखला आहे. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे,मी सोपा नाही,लोकसभेचे मतदान झाल्यानंतर रोखलेला निधी मिळालेला असेल.असे…