जामखेड प्रतिनिधी :धनराज पवार अंतरवाली-सराटी. ता.अंबड जि. जालना. या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रोजी सकल मराठा जामखेड तालुक्यातील बांधवांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ रोजी जामखेड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. हे नक्की वाचा Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम… ही तर सरकार ची लोकसभा निवडणुकीसाठी खेळी आहे – प्राध्यापक मधुकर राळेभात यावेळी आंदोलकांवर लाठी हल्ला, आणि गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. व आंदोलकांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना देण्यात आले.उद्या रविवारी ३ सप्टेंबर रोजी जामखेड तालुका बंद…
Author: mahalokwani
Maratha Reservation : जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे काल (शुक्रवार) मराठा आरक्षण (Maratha Reservation )आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार झाला. या घटनेत अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले. या प्रकरणात राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान जालना शहरात जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कालच्या प्रकारानंतर जालना येथे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. शहरातील अंबड चौफुली येथे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी ट्रक देखील जाळली. तसेच पत्रकारांनाही रोखले. या दरम्यान आंदोलकांचा जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दाखल झाले…
जालन्यात Jalana मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यामुळे एकच एक गोंधळ उडाला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. मराठा समाज जर तुम्हाला सत्तेत आणु शकतो तर तुम्हाला सत्तेतून बाहेर काढु शकतो. जामखेड प्रतिनिधी धनराज पवार याबाबत माहिती अशी की,29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती…
जामखेड :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या 2022-23वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव शाळेतील आदर्श, तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री.लक्ष्मीकांत एकनाथराव ईडलवार सर यांना या वर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जामखेड तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. मागील सोळा वर्षाच्या शैक्षणिक सेवेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक लेख,विविध शालेय व सहशालेय उपक्रम,तसेच शासनाच्या विविध पोर्टलवर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती,राष्ट्रीय स्तरावरच्या विविध…
धनराज पवार पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांना या सणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेत जामखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील, उपनिरीक्षक अनिल भारती तसेच कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या पोलीस बांधवांसाठी महिलांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं. [better-ads…
धनराज पवार कर्जत | कर्जत जामखेड मतदारसंघ हा आवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण मुळातच कमी आहे. अशातच जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षाही पाऊस कमी झाल्याने कर्जत-जामखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शेतकऱ्यांना ऐन कामाच्या वेळी विजेचा लपंडाव होत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसा १० ते १२ तास वीज उपलब्ध करा त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्जत जामखेड तालुक्यातील महावितरणच्या कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना स्वतंत्रपणे निवेदनाद्वारे विजेचा नियमित पुरवठा व पूर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन विनंती केली आणि उचित निर्णय नाही झाला तर आंदोलनाचा इशारा देखील दिला…
जामखेड प्रतिनिधी सध्या जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत खरीप पिके जळुन चालली आहेत. उर्वरित पिकांसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असताना महावितरणकडून शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाला आहे. शेतीपंप विज पुरवठा विस्कळीत शेतकरी आक्रमक भुतवडा, जगदाळे वस्ति व जमादारवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.आज रोजी महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, अशोक राळेभात, ऋषिकेश कदम,ज्ञानेश्वर कदम, वाल्मिक जगदाळे, पांडुरंग कदम, रमेश नेटके, पवन आजबे, ज्ञानदेव कोल्हे, शुभम आजबे, दिपक जगदाळे, अशोक नेटके,…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरामध्ये नव्यानेच सुरू झालेले गरीब हेअर सलुन या दालनाचे मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी खर्डा रोड येथे सोमनी टाॅवर कॉम्प्लेक्स येथे जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील व वसिम भाई बिल्डर कुरेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा मधुकर राळेभात,हज कमिटी चे सदस्य सलिम बागवान, उमरभाई कुरेशी, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभिषण (मामा) धनवडे,मोहन पवार,जमीर सय्यद,माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, शाकीर खान, नगरसेवक शामीरभाई सय्यद, राजेश वाव्हळ, अर्शद शेख,पवन राळेभात, संदीप गायकवाड,गणेश डोंगरे, माजी सरपंच समीरभाई पठाण, गफ्फारभाई पठाण, प्राचार्य विकी घायतडक सर, युवा नेते काकासाहेब गर्जे,सामाजिक कार्यकर्ते विकी (भाऊ) सदाफुले,अनिल पवार,अर्जुन म्हेत्रे,सनि सदाफुले…
ऑगस्ट महिना संपत आला आहे. सप्टेंबर September Rules महिन्यात अनेक महत्त्वाच्या आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांची माहिती प्रत्येकासाठी महत्त्वाची असते. सप्टेंबर महिन्यात जात असल्याने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा अडचणी वाढू शकतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत उरलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेणे. आरबीआयच्या घोषणेनुसार, 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंतच बदलता येतील. असे न करणाऱ्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात. सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या महत्त्वाच्या बदलांबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम, सिलिंडरच्या कमी झालेल्या किमतीपासून सुरुवात. September Rules सप्टेंबरपासून या नियमात बदल Asia Cup Ind Vs Pak : भारत पाकिस्तान सामना या दिवशी होणार ;…
कर्जत/ जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये यंदाच्या वर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस नसल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळत आहेत याशिवाय पशुधनही पाणी व चाऱ्याअभावी ग्रस्त आहे. चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करण्याचीही आ. रोहित पवार यांची मंत्र्यांना विनंती हे पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्यांची अतिशय गरज आहे तसेच पशुधन आणि नागरिकांनाही पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने पाण्याचे टँकरही चालू करण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषि विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे. सध्याच्या दुष्काळग्रस्त…