आमदार प्रा.राम शिंदेच्या लक्षवेधीद्वारे नामकरणाचा प्रश्न सरकारने काढला निकाली जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आमदार प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या एका हाॅस्पीटलच्या नामकरणाच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष वेधताच सरकारने याची तातडीने दखल घेतली आणि हाॅस्पीटल नामफलक नामकरणाचा प्रश्न सरकारने निकाली काढला. यामुळे गतीमान सरकार अन् वेगवान निर्णय याचा प्रत्यय आला. राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या वेगवान निर्णयांचा धडाका सुरू असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. मुंबई शहरातील रे रोड, माझगाव येथील न. भु. क्र. २५४ (भाग) येथील अहिल्यादेवी होळकर रुग्णालयाच्या जागेवर मे. कॅनकेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत उभारण्यात आलेल्या कर्करोग रुग्णालयाच्या दर्शनी भागावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा नावाचा उल्लेख करण्याबाबतचा…
Author: mahalokwani
आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्यातील खरिप पिंकाना जीवदान मिळणार आहेकुकडी आवर्तन ची आवश्यकता आणि गरज लक्षात घेऊन प्रा .राम शिंदे यांनी ओव्हरप्लोचे आवर्तन सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. आणि तो त्यांनी सत्यात उतरवून दाखविल आहे, तिकडे midc वरून राजकारण चालू असताना मात्र आमदार प्रा. राम शिंदे हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळाले, आणि त्यांचा शब्द खरा करून दाखविला आहे, सकाळी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार आज दिनांक 28/7/2023 रोजी संध्याकाळी कुकडी आवर्तन सोडण्याचे आदेश प्रा. राम शिंदे यांनी मुख्य…
जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार पाणीपुर नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं असा हा पदार्थ. भारतातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक नाक्यावर तुम्हाला आणखी काही मिळाले नाही तरी पाणीपुरीची गाडी नक्की सापडेल. जामखेड शहरात प्रथमच फॅमिली सह बसून पाणीपूरी खाण्यासाठी उत्तम ठिकाण इंद्रायणी पाणीपूरी & चाट सुरवात केली आहे. जामखेड शहरातील खर्डा रोड येथील राॅयल उद्योग समुहाचे सचिन गाडे यांनी खास खवय्येसाठी पाणीपूरी व चाट भांडार चे भव्य दालन खुले केले असून आज रोजी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. जामखेड करांच्या साठी इंद्रायणी पाणीपुरी चाट भंडार च्या…
Flu Eye महाराष्ट्रात डोळ्याच्या साथीचा फैलाव देशाच्या अनेक भागांमध्ये डोळ्यांच्या फ्लूच्या आजाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डोळ्यांच्या फ्लूची Flu Eye इतकी प्रकरणे समोर येण्याची गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे जर कुटुंबातील एका व्यक्तीला हा संसर्ग झाला असेल, तर सर्व सदस्यांना याची लागण होत आहे. लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्वांनाच या संसर्गाने ग्रासले आहे. हा आजार दिल्ली-एनसीआर, उत्तर भारतातील अनेक राज्यांपासून गुजरातपर्यंत पसरत आहे पावसाळ्यात तापमान कमी होऊन आर्द्रता वाढते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे डोळ्याच्या फ्लूसारखे Flu Eye आजार…
जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग बनला; मृत्युचा सापळा – जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने २० ते २५ लोकांचे अपघात होताना दिसत आहे, दि.२६ जुलै रोजी रात्री एका रुग्णाला जबर मार लागला असून सकाळी ११.०० वाजता पिक अप व व्हिस्टा गाडीची धडक झाली असून ड्रायव्हर जखमी झाला आहे, पंचायत समिती चे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी शासकीय दूध डेअरी,बीड रोड येथे झालेल्या अपघात ग्रस्ताला मदत करून, माणूसकीचा परिचय करून दिला आहे. साकत या आपल्या गावाहून जामखेड येथे येत असताना भरपावसात माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी सकाळी ११.०० च्या सुमारास…
Midc जमिनींच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करा – आमदार रोहित पवार कर्जत/जामखेड, ता. २७ – कर्जत-जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’चा प्रश्न आता राज्यात चांगलाच तापला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात निरव मोदी यांच्यासह अनेकांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे केला तर या जमिनींची खरेदी ही राम शिंदे आमदार असताना २०११ मध्येच झाल्याचा पलटवार आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच याबाबत चौकशी करण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे. आमदार रोहित पवार हे अनेक दिवसांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीच्या Midc मंजुरीसाठी प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करुन त्यांनी या एमआयडीसीला तत्वतः मंजुरी मिळवली.…
MIDC Karjat-Jamkhed| कर्जत जामखेड रास्तारोको आंदोलन जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन देऊन ही बैठक घेतली नाही , यामुळे आमदार रोहित पवार यांचे समर्थक आक्रमक झाले असून आज रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी ११.०० वाजता मोठ्या संख्येने रास्तारोको आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी खर्डा चौक येथे आंदोलन प्रसंगी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना घोषणा दिल्या.यामध्ये ” युवकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडण्यासाठी, जनतेचे व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आपण १३ खात्याचे मंत्री असताना एम आय डी सी MIDC साठी काय केले याचे उत्तर द्या मगच एमआयडीसीला आडकाठी आणा असा सवाल आंदोलन कर्त्यांनी आ.…
अहमदनगर (प्रतिनिधी)- मनिपुर राज्यात दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली नितीन कसबेकर , किरण जाधव , सोमा भाऊ शिंदे , स्वप्निल भिंगार दिवे , अक्षय बोरुडे , प्रज्ञाशील पाटेकर , मीरा गवळी, हिरा भिंगारदिवे, सुनिता घनवटे, रेखा साळवे, शोभा गाडे, पूजा बरके, रंजना भिंगारदिवे, लता बडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मणिपूर मध्ये सुरू असलेला हिंसाचार या अराजकतेस जबाबदार असलेले केंद्र सरकारच्या संवेदनशीलतेचा धिकार नोंदवून मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट…
कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली व अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून केवळ मंजुरीच्या आश्वासन मिळत असल्याने व कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने अखेर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनाला बसलेल्या आमदार रोहित पवार यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन तात्काळ स्वरूपात उद्याच्या उद्या बैठक…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार देशाचा सैनिक देशासाठी प्राण गेला तरीही मागे सरकत नाही तर ते लढतच राहतात. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी सर्व प्रशासकीय विभाग मदतीसाठी तयार आहेत. 26 जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद झालेल्या सर्व जवानांना मानवंदना देऊन आदरणीय वाहतो असे मनोगत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.जामखेड तालुका माजी सैनिक संघटना व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यामाने जामखेड मध्ये 24 वा कारगिल विजय दिवस अतिशय उत्साहात साजरा करून शहीद जवानांना मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली . यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, जामखेड महाविद्यालय जामखेड चे प्राचार्य एम एल डोंगरे,एनसीसी ऑफिसर कॅप्टन…