विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर मविआची स्थापना झाली त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या. त्यावेळी राजकीय खलबतांना कंटाळून अजित पवार यांनी थेट भाजपची हातमिळवणी केलेली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे मंत्रिपदाची शपथ घेतलेली. त्यानंतर ते सरकार फार काळ टिकलं नव्हतं. पण त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार यांना रडू कोसळलं होतं. अजित पवार जितके कडक शिस्तीचे तितकेच ते संवेदनशील आणि हळवे देखील आहेत. त्यांचा हा संवेदनशील आणि हळवा स्वभाव अनेकदा बघायला मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार यांचे अचानक दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण सुरु झालंय. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. ते कडक शिस्तीचे आहेत.…
Author: mahalokwani
जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा, जखमींना मिळत नाहीत पुरेश्या सुविधा जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार जामखेड शहरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रवीण बोलभट यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनवर माहिती दिली बस स्टँड समोर एक माणूस चक्कर येऊन पडला आहे. त्यास लवकर नेण्यास यावे. यावर कोठारी तातडीने रूग्णवाहिका घेवून , घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या व्यक्तीस ताबडतोब सरकारी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान साकत फाटा येथे एक अपघात झाल्याची माहिती संदीप ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली. त्यांनी ताबडतोब आपली रुग्णवाहिका घेऊन आठ किलोमीटर अंतरावर असलेले रावसाहेब भापकर साकत (वय वर्षे ७५) यांना आपल्या रुग्णवाहिकेत आणून दवाखान्यात दाखल केले. भापकर…
आयपीएल (IPL- 2023) स्पर्धेच्या नवव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने युवा गोलंदाज सुयश शर्माला संधी दिली. लांब केस असलेल्या तरुण गोलंदाज सुयश शर्माने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. वेंकटेश अय्यरच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला संधी मिळाली आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर येत आहे. विजय आणि पराभवाची मालिका सुरु झाली असून गुणतालिकेचं गणित झपाट्याने बदलत आहे. नुसते गुण मिळवून फायदा नाही तर धावगतीकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वच संघ यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. कोलकात्याने बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीसह दिग्गज खेळाडू असूनही विजयी धावांचा पाठलाग करणं कठीण झाला. बंगळुरूचा संपूर्ण संघ 123 धावांवर बाद झाला.…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार दि.०७ एप्रिल २०२३ जागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ ते १४ एप्रिल या कालावधीत “सुंदर माझा दवाखाना” स्वच्छता अभियान सर्व आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे.या अभियानात डॉक्टर,आरोग्य कर्मचारी सहभागी होत आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक,सामाजिक संस्थांनीही सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे आणि संस्था बळकटीकरणास मदत करावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालय’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशांक वाघमारे यांनी केले.सुंदर माझा दवाखाना अभियाना उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी रुग्ण कल्याण समितीचे आमदार नियुक्त सदस्य रमेश दादा आजबे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे,डॉ.किशोर बोराडे, स्नेहालय जिल्हा समन्वयक तथा उडान बालविवाह प्रतिबंध अभियानाचे योगेश अब्दुले,स्नेहज्योत प्रकल्पाचे मजहर खान,डेटा एन्ट्री अधिकारी मोहित कदम उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.वाघमारे…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील बस स्टंँण्ड जवळ , महाराष्ट्र बँक रोड येथे असणारे जीवनसाई हॉस्पिटल येथे शनिवार दि.०८/०४/२०२३ रोजी सकाळी १० ते ५.००वाजेपर्यंत अस्थिविकार तपासणी व निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी तज्ञ डॉ. अजय वानखडे MBBS,MS.ORTHO( MUMBAI) ,डॉ.करण कुलथे MBBS,D.ORTHO( MUMBAI) हे उपस्थित राहणार आहेत.या शिबीरा मध्ये🔳 एक्स – रे सुविधा,🔳इ.सी.जी सुविधा,🔳रक्त,लघवी तपासणी सुविधा, ऑपरेशन या सर्व सुविधांवर 50% सवलत तसेच मेडिकल वर 20% सवलत असून मशिनद्वारे हाडांची BMD तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे उपचार व मार्गदर्शन मोफत राहणार आहे.या शिबीरामध्ये रूग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सादेख पठाण यांनी केले. संपर्क डॉ.सादेख…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कृषि उत्पन्न बाजार समिति जामखेड पंचवार्षिक निवडणूकीसाठी सुमन बबन मिसाळ यांनी उमेद्वारी अनुसुचित जाती जमाती मधून अर्ज सहायक निवडणूक अधिकारी एन.बी.मुंढे यांच्याकडे दाखल केला. माजी सभापती स्वर्गीय बबनराव मिसाळ यांच्या पत्नी श्रीमती सुमन बबन मिसाळ कृषि उत्पन्न बाजार समिति जामखेड पंचवार्षिक निवडणूकीसाठी अनुसुचित जाती जमाती मधून अर्ज दाखल केला आहे. यावेळी सचिन (सर) गायवळ ,राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, नगरसेवक शामीर भाई सय्यद, चंदूशेठ गोलेकर,रामहारी गोपाळघरे , झिक्रीचे उपसरपंच श्रीकांत साठे उपस्थित होते. याबाबत माहिती अशी की,कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारमहाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, रामायण पारायण, धार्मिक कार्यक्रम, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेचमंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करून जामखेड शहरातील शनि चौक शनी/मारूती मंदिरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे ५ वाजता हनुमान चालीसा तसेच महाआरती करण्यात आली. महाआरतीचा बहुमान शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति चे विश्वस्त विनायक राऊत व राजेंद्र जाधव ( फिटर), बाळासाहेब गवळी यांना मिळाला. हभप पंढरीनाथ राजगुरु महाराज यांचे किर्तन झाले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात , नगरसेवक अमित चिंतामणी,शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति चे विश्वस्त विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड जि.अहमदनगर :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या हिवाळी परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर चा बीएचएमएस प्रथम वर्षाचा नियमीत बॅचचा निकाल सत्तर टक्के तर नियमित बॅचचा द्वितीय वर्षाचा शंभर टक्के लागला आहे. अशी माहिती प्र.प्राचार्य डॉ.संदीप सांगळे यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. बीएचएमएस प्रथम वर्षामध्ये अनुक्रमे कु.सुचिता गोरक्षनाथ आढाव -प्रथम,कु.देविका सुतार द्वितीय व कु.नेत्रा…
पिंपरी- चिंचवड भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातील मोबाईलवर ३० लाख रुपयांच्या खंडणीचा मागणी करणारा मेसेज आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातील कर्मचारी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद देत आहे. आमदार महेश लांडगे यांनी विविध समस्या नागरिकांना मांडता याव्यात यासाठी एक माबाईल क्रमांक दिलेला आहे. या मोबाईलवर ३० लाख रुपयांची खंडणी मागणारा मेसेज आला आहे. त्यामध्ये महेश लांडगे यांचे नाव असून जिवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड येथील नागेश विद्यालयामध्ये महावीर जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे प्रेस फोटोग्राफर कैलास शर्मा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी उद्योगपती प्रवीण छाजेड अनिल फिरोदिया उपस्थित होते यावेळी बोलताना कैलास शर्मा म्हणाले गेली तीस वर्षापासून जामखेड शहरांमध्ये मी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य पाहत आहे कुठेही अपघात झाला की ते रात्री बी रात्री आपली रुग्णवाहिका घेऊन जातात आणि अनेकांचे प्राण वाचवतात तसेच यावेळी शाळेतील शिक्षक संतोष सरसमकर म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना आम्ही फक्त काल महावीर जयंतीचा फोटो उपलब्ध होईल का असा फोन केला त्यांनी ताबडतोब आम्हाला महावीर स्वामीच्या प्रतिमा…