जामखेड jamkhed school तालुक्यातील एका नामंकित शिक्षण संस्थेची एक शाळा हि जामखेड तालुक्यातील अनेक मुलांच्या जीवाशी खेळ खेळताना पाहायला मिळत आहे. हा एवढा भयंकर प्रकार जामखेड शहरालगत असणाऱ्या एका नामांकित शाळेच्या आसपास घडत आहे, मात्र याकडे स्थानिक अधिकारी, प्रशासन, किंवा राजकीय मंडळी अतिशय गंभीर प्रश्नाच्या बाबतीत का डोळे मिटून बसले आहेत.
Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; या तारखेला जमा होणार डिसेंबरचा हप्ता
jamkhed school | जामखेड मधील हि शाळा

संबधीत विभागाचे अधिकारी नेमके कश्याची वाट बघत आहेत, कारण jamkhed school लहान लहान मुलांच्या जीवाशी हि शाळा खेळ खेळत आहे. तरी येथील नागरिक , अधिकारी का गप्प बसले आहेत हे समजणे अवघड आहे. जर वेळेत या शाळेवर कार्यवाही झाली नाही तर, येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, प्रशासन नेमकी कश्याची वाट बघत आहे.
Table of Contents
कारण या शाळेच्या सुरक्षा भिंती लगतच गॅसचे गोडावून आहे, तसे या ठिकाणी शेकडो टाक्या या गॅसने gas भरून ठेवल्या असतात, तसेच या टाक्या आणि शाळेच्या बसेस या एकाच ठिकाणी असतात, गॅस हा ज्वलनशील आहे, त्याचा कधीही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शाळेतील मुलांच्या जीवाला धोका आहे.

याची चौकशी होणे महत्वाचे
या शाळेस गॅस गोडावून जवळ असून सुद्धा कशी परवानगी मिळाली, का पैसे घेऊन परवानगी देण्यात आली या सर्व गोष्टीची चौकशी होणे महत्वाचे आहे, जर उद्या काही अपरिहार्य घटना घडल्यास यास जबाबदार कोण.. ?या बाबतीत सविस्तर माहिती आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे काय आहे हे जाणून घेणार आहोत.