काल मी जे काही बोललो ते…; वादाचं काहूर माजल्यानंतर जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jitendra Awhad यांच्या वक्तव्यावरून राजकारण पेटले
मी नेहमी महाराष्ट्राला संबोधित करत असतो. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. मी इतिहासाची मोडतोड करत नाही तर काही पुराव्यांच्या आधारे आपण हे वक्तव्य केल्याचं आव्हाड म्हणालेत.
Table of Contents
राम- प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात रामकृष्ण हरी म्हणतो. जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे. त्या श्रीरामाबद्दल बोलताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाहीये. पण जे याच्या विरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत.

त्यातल्या अयोध्या कंदातील सर्ग 52 आणि श्लोक 102 यात हा उल्लेख आहे. मात्र मला हा वाद वाढवायचा नाही म्हणून मी हे वाचून दाखवत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी गुन्ह्याला घाबरत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
