सरकारने आपल्यावर सगळे डाव टाकले तेच काही कळत नाही.डाव टाकले,हल्ले केले.मात्र मागे हटलो नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सुट्टी नाही.
जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार
आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मी दिलेल्या शब्दात बदलणार नाही आणि सरकारलाही बदलू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जामखेड येथे जेसीबीच्या सहाय्याने फूलांची उधळण केली तसेच मोठा हार घालून हलगीच्या सवाद्यात स्वागत केले.तसेच जरांगे पाटील यांची विराटसभा झाली.
जरांगे म्हणाले की , आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे. कुठेही उद्रेक करू नये. जाळपोळ करू नये. आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर मराठ्यांची पोर मेले तर आरक्षण कुणासाठी मिळवायचे? असा सवाल करत आता आरक्षण शेवटच्या क्षणापर्यंत आले आहे. ही संधी सोडायची नाही, असे आश्वासन करत उग्र आंदोलन करू नका.
माझे शरीर साथ देत नाही, परंतु तुमची उर्जा मला शांत बसू देत नाही. सरकार आरक्षण देणार आणि मराठेही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणारच नाही. मी तुमच्यातला आहे. मराठा समाजाच्या शब्दापुढे जाणार नाही आणि मरेपर्यंत गद्दारी करणार नाही. सरकारचे सगळे डाव उलटून लावले आहेत. सरकार नुसते पळतेय आरक्षण देण्यासाठी सरकार एक महिना मुदत दिली. यादरम्यान पाच हजार पुरावे दिले आहेत. आता कायदा पारीत करून, आरक्षण द्यावे.

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
मनोज जरांगे पाटील यांनी सायंकाळी पाच वाजता चोंडी येथे भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. आमदार प्रा. राम शिंदे यांनी जरांगे यांचे स्वागत केले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासह माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर,बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,सचिन (सर) गायवळ, रवि सुरवसे, अजय काशिद,गौतम उत्तेकर, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, लहू शिंदे, मंगेश आजबे, सोमनाथ पाचारणे, रमेश आजबे, तुषार पवार, ॲड.प्रवीण सानप, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे, अक्षय शिंदे, चोंडीचे सरपंच सुनील उबाळे आदी उपस्थित होते.
