Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Nakli note|अहिल्यानगर जिल्ह्यातील या तालुक्यात नकली नोटाची छपाई; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ब्रेकींग न्यूज

Nakli note|अहिल्यानगर जिल्ह्यातील या तालुक्यात नकली नोटाची छपाई; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 21, 2025Updated:February 21, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे पथकाची जिल्ह्यात कारवाई एक जण ताब्यात:100 आणि 500 रुपयांच्या नोटा छापल्या व्यवस्थित छापल्या नसल्याने फाडून टाकल्या कचऱ्याच्या डब्यात

अहिल्यानगर (दि.21 प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडील रहाणे मळा येथे एकाने बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या स्वरूपाने भारतात आलेला असताना तो कागद कुरिअरच्या माध्यमातून संगमनेर येथे मागवून प्रिंटरच्या सहाय्याने भारतीय चलनातील बनावट नोटा Nakli note बनविण्याचा प्रयत्न केला.परंतु एका घरात तयार करणाऱ्या इसमावर छापा घालून त्याला पकडण्यात आले आहे.

डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स पुणे च्या पथकाने ही कारवाई आज सकाळी केली आहे.रजनीकांत राजेंद्र रहाणे (रा. राहणे मळा, गुंजाळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
सदर घराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या खोलीमध्ये एका प्लास्टिक पिशवीमध्ये ए फोर साईचे शंभर पेपर मिळून आले त्या पेपरची पाहणी केली असता हाय सिक्युरिटी ग्रेड असलेली रंगीत पट्टी त्या ठिकाणी दिसून आली.

त्यावरून सदर पेपर हा भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्यासाठी वापरत असल्याची खात्री झाली. तसेच त्याच ठिकाणी एका प्लास्टिकच्या कचऱ्याच्या डब्यात काही ए फोर साईजचे फाडलेले पेपर आढळून आले. सदरची पेपरची पाहणी केली असता त्यावर भारतीय चलनातील 100 आणि 500 रुपयांच्या नोटा छापलेल्या दिसून आल्या परंतु त्या व्यवस्थित छापल्या नसल्याने त्या फाडून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्या असल्याचे दिसले.सदर खोलीत एचपी कंपनीचा स्मार्ट टॅंक 585 ऑल इन वन हा रंगीत प्रिंटर मिळून आला. रजनीकांत राहणे याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की अलीबाबा ऑनलाईन साइटवरून हाय सिक्युरिटी ट्रेड असलेली रंगीत पट्टी पेपरची ऑनलाईन खरेदी केली होती.

सदर पेपरवर तो एचपी कंपनीच्या ऑल-इन-वन प्रिंटरचा वापर करून भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले. काही खोट्या नोटा व्यवस्थित छापल्या न गेल्याने त्या पाडून फेकून दिल्या असल्याचेही कबूल केले.

त्यामुळे गुंजाळवाडी शिवारात सदर ठिकाणी छापा टाकला असता रजनीकांत राहाणे हा ऑनलाइन साईट अलीबाबा या ठिकाणावरून डीटीडीसी या कुरिअर कंपनी मार्फत हाय सिक्युरिटी पेपर मागवून त्याचा बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न करत असल्याची फिर्याद वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी झाकीर हुसेन मुल्ला यांनी दिली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSuresh Dhas| त्या नासक्याच नाव घेऊ नका; जरांगेंचा रोख कोणावर? धस कि मुंडे..!
Next Article हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा संपन्न: शिवभक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.