भारतात पुढील आठवड्यात 4 मोठे स्मार्टफोन mobile लाँच; मिड-रेंज मार्केटमध्ये वाढणार स्पर्धा
low budget car | ६ एअरबॅग असलेल्या कार घ्या फक्त ७ लाखापेक्षा कमी किमतीत; जाणून घ्या
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान Google, Vivo, Infinix आणि Apple या कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन New Mobiile भारतात लाँच करणार आहेत. यावेळी कंपन्यांचा फोकस अल्ट्रा-प्रीमियम सेगमेंटऐवजी मिड-रेंज आणि हाय-मिड रेंज स्मार्टफोनवर आहे.

New Mobiile | भारतात पुढील आठवड्यात 4 मोठे स्मार्टफोन लाँच
नवीन डिझाइन, मोठी बॅटरी, शक्तिशाली चिपसेट आणि नवीन सॉफ्टवेअरमुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
Pixel 10a

गुगल 18 फेब्रुवारी रोजी Pixel 10a लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.2-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि Tensor G4 चिपसेट मिळू शकतो.
mobile फोनमध्ये 48MP + 13MP ड्युअल रिअर कॅमेरा, 13MP फ्रंट कॅमेरा आणि 5100mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे. Android 16 सह येणाऱ्या या फोनची किंमत भारतात ₹50 हजारांपेक्षा जास्त असू शकते.
Infinix Note Edge
Infinix Note Edge 18 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. यात 6.78-इंच कर्व AMOLED डिस्प्ले, 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.
MediaTek Dimensity 7100 चिपसेट, 6500mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, IP65 रेटिंग आणि JBL ट्यून स्पीकर्स हे या फोनचे प्रमुख आकर्षण असू शकतात. या फोनची किंमत ₹25 हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
Vivo V70 Series
कंपनी 19 फेब्रुवारी रोजी Vivo V70 आणि V70 Elite हे स्मार्टफोन लाँच करू शकते. या सिरीजमध्ये 6.59-इंच 1.5K OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि IP68/IP69 रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे.
V70 मध्ये Snapdragon 7 Gen 4 तर V70 Elite मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर मिळू शकतो. 6500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह या सिरीजची किंमत ₹45,999 ते ₹51,999 दरम्यान असू शकते.
iPhone 17e

रिपोर्ट्सनुसार iPhone 17e देखील 19 फेब्रुवारी रोजी लाँच होऊ शकतो. यात 6.1-इंच OLED डिस्प्ले, Dynamic Island फीचर, A19 चिपसेट आणि 48MP सिंगल कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
हा फोन iOS 26 आणि MagSafe सपोर्टसह येऊ शकतो. भारतात याची सुरुवातीची किंमत सुमारे ₹59,900 असण्याची अपेक्षा आहे.
Table of Contents
बाजारावर परिणाम
या चार स्मार्टफोनच्या लॉन्चमुळे New Mobiile भारतीय बाजारात मिड-रेंज सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मोठी बॅटरी, AI फीचर्स आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे घटक ठरणार आहेत.