Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh lanke|खासदारीची शपथ घेताच; खा.निलेश लंके शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर

Nilesh lanke|खासदारीची शपथ घेताच; खा.निलेश लंके शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर

mahalokwaniBy mahalokwaniJuly 7, 2024Updated:July 7, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न आणि दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी खासदार निलेश लंके Nilesh lnake यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने पाच तारखेपासून शेतकरी जनआक्रोश आंदोलनाला नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आलेली आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आज खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जमलेले होते. कलेक्टर साहेब जागे व्हा अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आज दुपारी आंदोलकांनी दणाणून सोडला.

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यासोबत इतर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले होते . कल्याण रोड तसेच सोलापूर रोडवर काही शेतकरी बांधवांचे ट्रॅक्टर अडवत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या आंदोलकांनी यासंदर्भात पोलिसांना जाब विचारला त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवण्यात आली आणि शेतकऱ्यांचे कोणतेही ट्रॅक्टर न अडवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र नगर शहरात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे.

दुपारपर्यंत खासदार निलेश लंके Nilesh lanke हे आंदोलनस्थळी होते मात्र त्यानंतर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील येणार असल्याकारणाने निलेश लंके हे छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माळीवाडा बस स्टँड परिसरातील पुतळ्याच्या ठिकाणी रवाना झाले मात्र शेतकरी बांधवांनी देखील ट्रॅक्टर सहित तिकडे धाव घेतली त्यामुळे संपूर्ण नगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. वृत्त लिहीपर्यंत नगर छत्रपती संभाजीनगर हायवेवरील अनेक प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

निलेश लंके यांचे आंदोलन जिथे सुरू आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात गाया म्हशी शेळ्या मेंढ्या आणण्यात आलेल्या असून कलेक्टर ऑफिसच्या दरवाज्याजवळ बैलगाडीला गाया बांधलेल्या आहेत. आज रविवार असल्याकारणाने कलेक्टर ऑफिसला सुट्टी आहे मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात कलेक्टर ऑफिसमध्ये आज पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात आहे.

निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी दुपारी बाराच्या सुमारास ट्रॅक्टर चालवतच कलेक्टर ऑफिसमोर आगमन केले त्यानंतर मोठ्या प्रमाणात निलेश लंके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है यासोबत कलेक्टर साहेब जागे व्हा कलेक्टर साहेब जागे व्हा अशा स्वरूपाच्या घोषणा महिलांनी दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगर जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने भाजल्या भाकरी, हाटल पिठलं
Next Article Nilesh Lanke। खासदार लंकेंनी पालकमंत्री विखेंचा शब्द पाळला; अखेर जनआक्रोश आंदोलन स्थगित
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.