कधी कधी वाटतं मला ,
एकदा माझ्या मनासारखे व्हावे ……
जेव्हा मनात येईल तेव्हा बाहेर जावे,
आकाशातल्या पाखरा सारखे उंच उडून पहावे,
कोणतेच स्वप्न माझे अधुरे न राहावे,
एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे……

संस्काराचा पिंजरा माझ्यापासून लांब असावा,
आयुष्याचा एक दिवस आपला का नसावा,
मोकळा श्वास मला घेऊन द्यावे,
एकदा तरी माझ्या मनासारखी व्हावे……
कधी वाटतं मला स्वप्नात जगावे,
सगळ्या कौतुक वाटेल असे काही बनावे,
आकाशातील तारा बनवून सगळ्यांना पहावे,
एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे……
कल्पनेच्या स्वप्नातून बाहेर न यावे,
कोणताच विचार न करता मनमोकळे फिरावे,
मनाला वाटण त्याचे गोष्टी करावे,
प्रेम होईल सगळ्यांना असे मी जगावे,
एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे…

कवियत्री :- मोनाली खरड