Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुक्यात प्रा. सचिन गायवळ सर यांच्या भोवतीच फिरणार येणाऱ्या निवडणुकांचे चक्र.!

जामखेड तालुक्यात प्रा. सचिन गायवळ सर यांच्या भोवतीच फिरणार येणाऱ्या निवडणुकांचे चक्र.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात चालला सरांचा करिष्मा, अशी जामखेड तालुक्यात चर्चा..

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

याबाबत माहिती अशी की, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांच्या पॅनल मध्ये मोठ्या चुरशीने लढवली गेली, दोन्ही पॅनलला नऊ अशा समसमान जागा मिळाल्या.
खासदार सुजय विखे गटाला मानणारे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी आमदार राम शिंदे यांच्याबरोबर युतीसाठी चर्चा करीत असताना अचानकपणे आमदार रोहित दादा पवार यांच्याबरोबर एकत्र युती करून बाजार समितीची निवडणूक लढवली. त्यांनाही सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग असल्याने आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे पारडे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले होेते.


सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणारे प्राध्यापक सचिन सर गायवळ यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आमदार रोहित पवार यांचे कान भरवून प्रा. गायवळ यांच्या विरोधात अनेक गोष्टी विनाकार रंगवून सांगितल्या गेल्याचे बोलले जात आहे? व त्यांना आमदार पवार यांच्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे राबविले गेले, परंतु काही नेत्यांनी प्रा. गायवळ यांचे मन वळविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही, त्यामुळे नाईलाजाने प्रा. सचिन सर गायवळ यांनी शेवटच्या क्षणी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून आमदार राम शिंदे यांच्या पॅनलला पाठिंबा देऊन जामखेड तालुक्यात प्रचाराची रणनीती ठरवली व स्वतः जातीने प्रचारात झोकून देऊन सोसायटी मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघात मोठ्या फरकाने विजय संपादन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले व आपले राजकीय अस्तित्व अंतर्गत विरोधकांना प्रथमच दाखवून दिले,याचीच चर्चा निवडणूक निकाला नंतर संपूर्ण तालुक्यात होऊ लागली आहे.


ग्रामपंचायत मतदार संघात त्यांचा करिष्मा कामाला आला त्यामुळे अटीतीच्या निवडणुकीत आमदार पवार यांना 18 जागांपैकी 9 जागा तर आमदार शिंदे यांच्या पॅनलला 9 अशा समसमान जागा मिळाल्या कोणालाच बहुमत नसल्याने जामखेड बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड कशा पद्धतीने रंजक होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एक मात्र खरे आहे की, राजकारणात नवखे असणारे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कामातून सर्वांना मदतीचा हात देणारे प्रा. सचिन सर गायवळ यांच्या भोवतीच जामखेड बाजार समितीची निवडणूक फिरली असल्याचे दिसून आले आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते पुढील राजकीय भूमिका काय घेणार यावर त्यांचे व त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे चित्र सध्यातरी जामखेड तालुक्यात दिसत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMaharashtra| महाराष्ट्रात पहिल्यांदाच भटक्या विमुक्त जमातीसाठी कृती आराखडा तयार.!
Next Article जामखेड तालुक्यातील घोडेगांव येथे संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.