Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पारनेर न्यायाधीश उमा बोराडे यांची बदली; अनेकांना कायद्याच्या चौकटीत राहून मदतीची भूमिका वकील संघातर्फे सत्कार.!

पारनेर न्यायाधीश उमा बोराडे यांची बदली; अनेकांना कायद्याच्या चौकटीत राहून मदतीची भूमिका वकील संघातर्फे सत्कार.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पारनेर : प्रतिनिधी

न्यायाधीश म्हणून काम करताना अनेक बंधने पाळावी लागतात. या बंधनांमध्ये तसेच कायद्याच्या चौकटीत राहून पारनेर न्यायालयातील न्यायाधीश उमा बोराडे यांनी सामाजिक बांधिलकी निभावली. त्यांची पनवेल येथे बदली झाली असून त्यांच्या सामाजिक कार्याला यावेळी अनेक वकीलांनी उजाळा दिला.


पारनेर न्यायालयाच्या न्यायाधीश उमा बोराडे यांंची पनवेल येथे बदली झाली असून पारनेर वकील संघाच्या वतीने त्यांचा नुकताच हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. न्यायदानाने पवित्र कार्य निभावताना सामाजिक कार्यातही त्या सक्रीय असत. कोरोनाच्या संकटामध्ये निघोज येथील निवरा गृहामध्ये नांदेड येथील १०५ मजूरांना ठेवण्यात आले होते. मजूरांमधील रूपाली राहुल हुडकर हीम महिला प्रसुत झाली. एकीकडे कोरोनाचा प्रकोप व दुसरीकडे रूपाली या महिलेची प्रसुती हा प्रसंग वैद्यकिय अधिकाऱ्यांसाठी आव्हानात्मक होता. मात्र या महिलेची सुखरूप प्रसुती करण्यात आली. ही माहीती न्यायाधीश बोराडे यांना समजल्यानंतर त्यांनी निघोज येथील निवारागृहात जाऊन बाळ व बाळंतणीची भेट घेत तिला आधार दिला. तेथील मजुरांच्या जेवणासाठी ४० हजार रूपये किराणा खरेदीसाठी त्यांनी दिले.


न्यायालयात कोणी पीडीत महिला किंवा वयोवृध्द पक्षकार असेल तर उमा बोराडे या त्यांची चौकशी करीत. त्यांना आवश्यक असलेली मदत करून त्या त्यांची सामाजिक बांधिलकी जपत. निरोप समारंभास न्यायाधीश आर.के.साळवी व एस.सी.साळवी, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडीतराव कोल्हे, उपाध्यक्ष अ‍ॅड. जे .एस. शेख, सचिव अ‍ॅड. एस.पी.वाळुंज, अ‍ॅड. एस.के. काणे, अ‍ॅड. एस. के.मेसे, अ‍ॅड. ए. एन.रोहोकले, अ‍ॅड.एम. आर.गायकवाड, अ‍ॅड. बी. एम. पठारे, अ‍ॅड.एस.टी.गुंड, अ‍ॅड. वाय. व्ही.सालके, अ‍ॅड. एम. एस. औटी, अ‍ॅड. बी .एस. झावरे, अ‍ॅड. टी.डी.उबाळे, अ‍ॅड. पळवळ, अ‍ॅड. एस. एस. जाधव, अ‍ॅड. पी. बी. थोरात, अ‍ॅड. अमोल औटी, अ‍ॅड. स्नेहा झावरे, अ‍ॅड. वर्षा भालेकर, अ‍ॅड. गायकवाड, अ‍ॅड. सप्रे, अ‍ॅड. नांदे, अ‍ॅड. गोरडे, अ‍ॅड. ठुबे, अ‍ॅड. पवार, अ‍ॅड. गवळी, अ‍ॅड. जगदीप शिंंदे, अ‍ॅड. युवराज पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया: अ‍ॅड. स्नेहा राहुल झावरे

नव्या वकीलांना धैर्य:- न्यायाधीश उमा बोराडे या नव्याने वकीली सुरू करणाऱ्या वकीलांना धैर्य देत. त्यांना मार्गदर्शन करून दिलासा देत. कायद्यातील नव नवीन विषयांचा त्या सल्ला देत. विशेषतः महिला वकीलांसाठी बोराडे यांचा मोठा आधार असायचा.

उमा बोराडे यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम भावूक होता. बोराडे या वकीलांच्या सुख, दुःखात सहभागी होत. कायद्याच्या चौकटीत राहून वकीलांना हवी ती मदत करण्यात त्या अग्रेसर असत. पाच वर्षांच्या कार्यकाळात बोराडे यांनी अनेकदा मदत केली. त्यांची बदली झाल्याने अनेक वकील भावूक झाले होते.

निर्भयाच्या नावे १० हजारांची ठेव !

निघोज येथील निवारागृहात प्रसुत झालेल्या बाळांतीण व बाळाची भेट घेतल्यानंतर न्यायाधीश उमा बोराडे यांनी जन्मलेल्या मुलीचे निर्भया असे नामकरण केले. स्त्री जन्माचे स्वागत म्हणून १० हजार रूपयांची ठेव पावती तीच्या नावाने त्यांनी करून दिली. या आळवणीलाही यावेळी उजाळा मिळाला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरसेवक सुनिल त्र्यंबके करणार प्रभाग दोनचा कायापालट ; दहा हजार वृक्षारोपणाचा संकल्प.!
Next Article ब्रेकिंग न्यूज| नगर जिल्ह्यात अलर्ट; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी.!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.