Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मॅरेथॉन डिजिटल होल्डिंगचा कौतुकास्पद उपक्रम;निवारा बालगृहाला एक महिन्याचा किराणा भेट

मॅरेथॉन डिजिटल होल्डिंगचा कौतुकास्पद उपक्रम;निवारा बालगृहाला एक महिन्याचा किराणा भेट

mahalokwaniBy mahalokwaniMay 13, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
जामखेड – मॅरेथॉन डिजिटल होल्डिंग जामखेड शाखेतर्फे ग्रामीण विकास केंद्र संचलित अनाथ, निराधार व लोककलावंताच्या मुलांकरिता कार्यरत असणाऱ्या निवारा बालगृहाला एक महिन्याचा किराणा भेट देण्यात आला. सोबतच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष अरुण आबा जाधव यांच्याशी मॅरेथॉन होल्डिंगचे केतन गर्जे यांनी संपर्क साधून संस्थेसाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी जाधव यांनी सध्या आम्हाला किराण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी गर्जे यांनी यांस सहमती देत आम्ही संस्थेला एक महिन्याचा किराणा देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर आज दिनांक 13 मे रोजी मॅरेथॉन डिजिटल होल्डींगच्या जामखेड येथील सहकाऱ्यांनी संस्थेस भेट देत एक महिन्याचा किराणा भेट दिला.

समाजात काम करत असताना आपण या समाजाचे देणे लागतो, या भावनेतून आम्ही संस्थेला भेट देत असल्याचे गर्जे यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांना महिन्याभराचा किराणा देऊन मॅरेथॉन डिजिटल होल्डींगने आपली सेवाभाववृत्ती दाखवल्याचे अरुण आबा जाधव आणि संतोष चव्हाण यांनी मॅरेथॉन डिजिटल होल्डिंग व सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी अरुण आबा जाधव, संतोष चव्हाण, केतन गर्जे, तेजस पंगुडवाले, यश भाकरे, जय चिंतामणी, अजिक्य राळेभात, केतन राळेभात, प्रज्वल राळेभात, राहुल राळेभात, ऋषी उबाले, सागर राळेभात, विशाल गीते, महेश डोके, वैभव सगर आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePune Crime| पुणे जिल्ह्यातील आवारे हत्याकांडात राष्ट्रवादीच्या या आमदाराचा हात?; आवारेच्या आईने केले हे गंभीर आरोपाने एकच खळबळ..!
Next Article नगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची; मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडून पाहणी
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.